Home /News /crime /

Aurangabad : गोण्याभरुन नोटा आणायचा, अलिशान गाड्या, अखेर 'तीस-तीस' घोटाळ्याच्या मास्टरमाईंडला बेड्या

Aurangabad : गोण्याभरुन नोटा आणायचा, अलिशान गाड्या, अखेर 'तीस-तीस' घोटाळ्याच्या मास्टरमाईंडला बेड्या

औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) 'तीस-तीस' घोटाळ्याचा (30-30 scam) मास्टरमाईंड असलेल्या संतोष राठोडला बेड्या (Santosh Rathore arrest) ठोकल्या. संतोष राठोड या भामट्याने अनेक शेतकऱ्यांना मुद्दलला जास्त व्याज देतो असं आमिष दाखवूत अनेक खोट्या स्किममध्ये फसवलं आहे.

पुढे वाचा ...
औरंगाबाद, 22 जानेवारी : गेल्या आठवड्यात सोलापूरच्या (Solapur) बार्शीतल्या 'फटे स्कॅम'ची (Fate Scam Solapur) चांगलीच चर्चा झाली होती. या प्रकरणातील आरोपीने शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक करण्याच्या नावाने अनेकांना लुबाडल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे हे प्रकरण ताजं असताना आता आणखी एक प्रकरण चर्चेत आलं आहे. औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) 'तीस-तीस' घोटाळ्याचा मास्टरमाईंड (30-30 scam) असलेल्या संतोष राठोडला  (Santosh Rathore) बेड्या ठोकल्या. संतोष राठोड या भामट्याने अनेक शेतकऱ्यांना (Farmers) मुद्दलला जास्त व्याज देतो असं आमिष दाखवूत अनेक खोट्या स्किममध्ये (fake scheme) फसवलं आहे. यासाठी आरोपीने स्वत:ला शेतकऱ्यांसमोर खूप श्रीमंत असल्यासारखं सादर केलं. पण अखेर त्याच्या खोटेपणाचा फुगा फुटलाय. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानंतर त्याला औरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत. विशेष म्हणजे जवळपास 350 ते 500 कोटींचा हा घोटाळा असल्याची चर्चा आहे. आरोपीने लोकांना फसवायला सुरु करण्याचीदेखील एक खास स्टोरी आहे. त्याच्या या फसवणुकीला एक-दोन महिन्यापूर्वी सुरुवात झाली नाही तर 2016 पासून त्याने लोकांना गंडवायला सुरुवात केलीय. त्यासाठी त्याने खूप डोकं वापरलं. आरोपी 2016 मध्ये दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसाठी जमिनी गेलेल्या भागात गेला. तिथे त्याने नागरिकांना पैसे गुंतविण्यासाठी वेगवेगळे आमिषं दाखवली. विशेष म्हणजे त्याने बिडकीन आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना लक्ष्य केलं होतं. तो त्यांना पैशांच्या गुंतवणुकीसाठी काहीही आमिषं दाखवत असे. त्याने सुरुवातीला पाच टक्क्यांनी व्याजाची परतफेड करण्याची स्किम सुरु केली. त्यानंतर त्याने ही स्किम वाढवत हळूहळू 25 टक्क्यांवर आणली. तब्बल 25 टक्के व्याज मिळत असल्याचे बघून अनेक शेतकरी आणि स्थानिक पातळीवरचे काही राजकारणीदेखील आरोपीच्या जाळ्यात अडकले. (शाळेच्या मुख्याध्यापकांचा संशयास्पद मृत्यू; सकाळी वॉकसाठी पडले होते घराबाहेर) आरोपी संतोष राठोड याने लोकांना लुबाडण्याचं काम सुरुच ठेवलं. त्याने आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत तीस-तीस नावाचा ग्रुप बनवला. त्यानंतर संतोषने आपल्या नातेवाईकांसोबत प्रचंड हवा केली. त्याच्या अलिशान गाड्या गावात फिरु लागल्या. लोकांना स्किम सांगू लागल्या. विशेष म्हणजे लोकांना पैशांची परतफेड करण्यासाठी गोण्याभरुन पैसे येऊ लागले. हे पाहुण अनेकजण चक्रावली. अनेकांचा संतोष राठोडवर विश्वास बसला. त्यांनी त्याच्या खोट्या आमिषांना बळी पडून गुंतवणूक केली. जवळपास 30 गावातील शेतकरी त्याच्या जाळ्यात ओढळले गेले. आरोपीने असा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. (कोरोना झाल्यानंतर लसीकरण आणि प्रीकॉशन डोसचा कालावधी बदलला, इतक्या महिन्याचे अंतर) संतोष राठोडच्या खोट्या हवेने अनेकांनी कोट्यवधी रुपये गुंतवले. पण आज अशा शेतकऱ्यांना देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होतेय. कारण गेल्या दहा महिन्यांपासून व्याजाची परतफेड मिळालेली नाही. याशिवाय मुद्दल मिळणंही कठीण होऊन बसलं आहे. अखेर आरोपी संतोष राठोड याच्याविरोधात शुक्रवारी दौलत राठोड नावाच्या व्यक्तीने आपली 33 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यानंतर औरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी आरोपी संतोष राठोडला त्याच्या कन्नड येथील घरातून बेड्या ठोकल्याय
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या