Home /News /crime /

पुतण्याने घरात घुसून केला काकूचा खून, लंपास केले तब्बल 19 तोळे सोनं, पण...

पुतण्याने घरात घुसून केला काकूचा खून, लंपास केले तब्बल 19 तोळे सोनं, पण...

चोरट्याने 60 वर्षीय महिलेची हत्या करून 5 लाख 70 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती.

    मनोज कुळकर्णी, प्रतिनिधी मुंबई, 07 सप्टेंबर : मुंबईतील कुर्ला परिसरात रविवारी रात्री 60 वर्षीय महिलेची तिच्या पुतण्याने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे, पुतण्याने खून करून तब्बल 19 तोळे सोनं लंपास केलं होतं. कुर्ला पूर्वेला असलेल्या जागृती नगर मधील वर्षा सोसायटीच्या अन्वर पवार इमारतीत घरात घुसून एका चोरट्याने 60 वर्षीय महिलेची हत्या करून 5 लाख 70 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना  घडली होती. पंकजा मुंडेंना बीडमधूनच घरचा अहेर, 'एका नेत्याच्या विचाराने निर्णय घेऊ नका!' या इमारतीच्या  रूम नंबर 207 मध्ये जरीना अन्वर शेख या 60 वर्षीय महिला राहतात. त्या आजारी असल्याने एकट्याच इथे राहत होत्या. त्यांची मुलगी येऊन जाऊन त्यांच्या घरी देखभाल करत होती. रविवारी मध्यरात्री त्यांच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि त्याने धारधार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर घरातील आणि त्यांच्या अंगावरील सर्व दागिने चोरून तिथून पळ काढला. चिकन सूप प्यायल्यानंतर महिलेचा पोटात झाला स्फोट आणि... या घटनेची माहिती मिळताच  नेहरू नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हत्या आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी  सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे या आरोपीचा शोध घेतला असता हा चोरटा या मृतक महिलेचा पुतण्या असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: खून

    पुढील बातम्या