मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पत्नी माहेराहून येत नसल्याने विकासने ओलांडली मर्यादा, आधी काकीला खोलीत घेऊन गेला अन्...दोघेही रुग्णालयात!

पत्नी माहेराहून येत नसल्याने विकासने ओलांडली मर्यादा, आधी काकीला खोलीत घेऊन गेला अन्...दोघेही रुग्णालयात!

Representative Image

Representative Image

सहा तासांनंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी काकीला मृत घोषित केलं.

    आग्रा, 12 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एक तरुण पत्नीला माहेराहून आणण्यासाठी वेडापिसा झाला. या वेड्यात त्याने आपल्याच घरातील सदस्याची हत्या केली. शाहपुरा येथे राहणाऱ्या विकासचं काही दिवसांपूर्वी पत्नीसोबत भांडण झालं होतं. ज्यानंतर पत्नी रागावून माहेरी निघून गेली. यानंतर विकासने पत्नीला फोन करुन परत येण्यास सांगितलं. मात्र पत्नी परत येण्यासाठी तयार नव्हती. शेवटी तरुण आपल्या काकीकडे गेला आणि तिला पत्नीला बोलवण्यास सांगितलं. तो काकीवर दबाव आणत होता. गुरुवारी विकासशिवाय घरात काकी आणि आजी होती. तेव्हा विकासने पुन्हा काकीला पत्नीला बोलवण्याची विनंती केली. मात्र काकीने पुन्हा यास नकार दिला. यानंतर विकासचा पारा चढला आणि तो काकीला जबरदस्तीने एका खोलीत घेऊन गेला. आणि पत्नीला बोलवण्यासाठी दबाव आणू लागला. यादरम्यान तो स्वत:देखील खोलीत होता. विकासची आजी त्याला दार उघडण्यास सांगत होती, मात्र तो कोणाचंही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता. यादरम्यान आजूबाजूचे लोकही जमा झाले. सर्वजण विकासला दार उघडण्यास सांगत होते. तो आपला हट्ट सोडत नव्हता. यानंतर नातेवाईकांनी तातडीने प्रीताला माहेराहून बोलावलं. रात्री 11 वाजता त्याची पत्नी आली. मात्र तरीही विकासने गेट उघडलं नाही. दार लोखंडाचं होतं, त्यामुळे तो तोडूही शकत नव्हते. साधारण रात्री 11.30 वाजता 6 तास खोलीत बंद ठेवल्यानंतर विकासने आधी काकीच्या शरीरावर चाकूने हल्ला केला. यानंतर स्वत:च्यागी पोटातवर चाकू खुपसून गेट उघडला. माणुसकीचा मृत्यू'! चाकूने सपासप वार करत तरुणाची हत्या, रस्त्यावर उभा राहून बघत राहिले लोक, भयानक Video यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काकीला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं, तर विकासवर दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder, Uttar pradesh news

    पुढील बातम्या