Home /News /crime /

सरकारी कार्यालयात पत्नीऐवजी पतीची हजेरी; तपास अधिराऱ्यांसमोर बिंग उघड

सरकारी कार्यालयात पत्नीऐवजी पतीची हजेरी; तपास अधिराऱ्यांसमोर बिंग उघड

भर कार्यालयासमोर अधिकाऱ्यांनी पतीची धुलाई केली.

    पाटना, 23 मे : बिहारच्या (Bihar News) वैशाली जिल्ह्यात सरकारी कार्यालयात अंगणवाडी सेविकेच्या ऐवजी तिचा पती कामावर आल्याचं पाहून तपास अधिकारी संतापले. यानंतर SDM यांनी महिलेच्या पतीच्या कानशिलात लगावली. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Attendance of husband instead of wife in government office) वैशाली जिल्ह्यातील सरकारी कार्यालयाबाबत एसडीएम यांना तक्रार मिळाली होती. येथे दलालांचा सुळसुळाट झाला असून महिलांऐवजी त्याचे पती कामावर येत असल्याचं सांगितलं जात होतं. याचा तपास करण्यासाठी अधिकारी पुढे आला. यावेळी त्यांनी पाहिलं की, सेविका राधा कुमारीच्या ऐवजी त्यांचे पती अशोक पासवान होते. त्यांना पाहताच अधिकाऱ्यांनी त्यांच्या कानशिलात लगावली. यानंतर पतीवर एफआयआर दाखल करण्यात आली. सध्या अधिकाऱ्यांनी कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्नीच्या ऐवजी पतीने कामाच्या ठिकाणी हजेरी लावणं कायदेशीरपणे अयोग्य आहे. तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारे मारहाण करणे योग्य नसल्याचं सांगत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मगणी करण्यात येत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Crime news

    पुढील बातम्या