Home /News /crime /

नराधमाने 7 वर्षांच्या चिमुरडीचा ओठ दाताने तोडला, औरंगाबादेतील संतापजनक घटना

नराधमाने 7 वर्षांच्या चिमुरडीचा ओठ दाताने तोडला, औरंगाबादेतील संतापजनक घटना

वडगाव कोल्हाटी इथं गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. 7 वर्षीय चिमुकली मिस्त्री काम करणाऱ्या आजी व मामाकडे आलेली होती.

    सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 16 ऑक्टोबर : हाथरस प्रकरणामुळे अवघ्या देशभरात संतापाची लाट उसळली होती. ही घटना ताजी असताना महाराष्ट्राला हादरावून सोडणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव इथं घडली आहे. एका 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. संतापजनक म्हणजे, या नराधमाने तिचा ओठ दाताने चावून तोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव कोल्हाटी इथं गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. 7 वर्षीय चिमुकली मिस्त्री काम करणाऱ्या आजी व मामाकडे आलेली होती. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या मुलीला आरोपीने घरातून अलगद पांघरुणासहीत उचलून नेले. त्यानंतर जवळच्या रिकाम्या प्लॉटमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. गायीला मिठी मारणं थेरेपी? कोरोनाच्या परिस्थितीत Cow Hugging चा ट्रेंड अत्याचार सुरू असताना या नराधमाने पीडित चिमुरडीचा ओठ दाताने चावून तोडला. यावेळी मुलगी जोरात ओरडल्याने शेजारील लोकं येतील या भीतीने आरोपीने तिथेच तिला सोडून धूम ठोकली. त्यानंतर आवाज झाल्यामुळे लोकांनी धाव घेतली असता धक्कादायक प्रकार समोर आला. स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेतील मुलीला नातेवाईकांनी व शेजारील लोकांनी औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयात रवाना केले. मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाचा पोलीस शोध घेत आहे. महिलेच्या घरात घुसणाऱ्या दारुड्याला बेदम चोप दरम्यान, एकटी समजून एका महिलेची घरात घुसून तिची छेड काढणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. त्याने विचारही केला नसेल, अशी अवस्था या महिलेनं त्याची केली. रात्रीच्या वेळेला दारूच्या नशेत घरात घुसून त्याने महिलेची छेड काढली आणि मग महिलेनंही त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. आधी त्याला एका झाडाला बांधलं आणि मग धू धू धुतलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) झाला आहे. ही घटना आहे मध्य प्रदेशच्या (madhya pradesh) बालाघाटमधली (balaghat). अचनाकपूर गावात एक व्यक्ती रात्री दारूच्या नशेत एका घरात घुसला. त्या घरात एक महिला एकटीच होती. महिलेला एकटं पाहून तो तिला छेडू लागला. एक बेवडा अचानक घरात घुसून छेडू लागल्यानंतर महिलेनं आरडाओरडा सुरू केला. तिनं आपल्या नातेवाईकांना बोलावलं. तिचा आवाज ऐकून नातेवाईकही तात्काळ धावून आले. शिवाय गावातील लोकही जमले. लोक जमा होताच दारूच्या नशेत असलेला व्यक्ती घाबरला आणि तिथून तो पळू लागला. पण त्याचा पळण्याचा प्रयत्न फसला. त्याची तिथून काही सुटका झाली नाही. त्याला सर्वांनी मिळून पकडलंच. महिलेनं सर्वांच्या मदतीने त्याला बांधलं. इतक्यावरच ती थांबली नाही तर तिनं त्याला चांगलाच चोप दिला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या