मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

महाराष्ट्र हादरला! जुन्या वादातून गाठला विकृतीचा कळस; नराधमांनी अल्पवयीन मुलीचे कपडे फाडले अन्...

महाराष्ट्र हादरला! जुन्या वादातून गाठला विकृतीचा कळस; नराधमांनी अल्पवयीन मुलीचे कपडे फाडले अन्...

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Solapur: सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील दोन जणांनी एका अल्पवयीन मुलीसोबत विकृतीचा कळस गाठला आहे.

  • Published by:  News18 Desk

अक्कलकोट, 28 मार्च: सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील दोन जणांनी एका अल्पवयीन मुलीसोबत विकृतीचा कळस गाठला आहे. आरोपींनी जुन्या वादातून पीडित मुलीला मारहाण करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न (attempt to undress minor girl by beating her) केला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून पुढील तपास केला जात आहे.

शिवशंकर वाघमारे आणि राजकुमार वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 मार्च रोजी सायंकाळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवशंकर आणि राजकुमार यांचा गावातील एका अल्पवयीन मुलीसोबत वाद होता. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यात हा वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी पुन्हा एकदा त्यांच्यात हा वाद उफाळला.

हेही वाचा- व्हॉट्सअ‍ॅपवर मुलींचा व्हायचा सौदा मग लॉजवर चालायचं धक्कादायक कृत्य; मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

यावेळी संतापलेल्या आरोपी शिवशंकर आणि राजकुमार यांनी अल्पवयीन मुलीला हाताने बेदम मारहाण केली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी पीडित मुलीच्या अंगावरील कपडे फाडून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपी आणि पीडित मुलगी अक्कलकोट तालुक्यातील एकाच गावातील रहिवासी आहेत.

हेही वाचा- प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणासोबत घडला घात; हत्येच्या थरारक घटनेनं जळगाव हादरलं!

या संतापजनक घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलीने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला आहे. पण किरकोळ कारणातून झालेल्या वादातून आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Solapur