Home /News /crime /

डोंबिवलीकरांनो, सावध राहा! तुमच्या सोसायटीत अशा प्रकारे चोर करता एंट्री, पाहा हा VIDEO

डोंबिवलीकरांनो, सावध राहा! तुमच्या सोसायटीत अशा प्रकारे चोर करता एंट्री, पाहा हा VIDEO

एकीकडे कल्याण-डोंबिवलीत एटीएम चोरीच्या घटना ताजी असताना दुसरीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसू नये म्हणून स्प्रे मारून चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे.

डोंबिवली, 12 जून : चोर चोरी करण्यासाठी काय शक्कल लढवेल याचा नेम नाही. डोंबिवलीतील मिलापनगर येथे एका चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरी करण्यासाठी बंगल्यात घुसलेल्या चोरांनी कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून  म्हणून स्प्रे मारून चोरी करायचा प्रयत्न केला, मात्र तो फसला. पण हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एकीकडे कल्याण-डोंबिवलीत एटीएम चोरीच्या घटना ताजी असताना दुसरीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसू नये म्हणून स्प्रे मारून चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. डोंबिवली एमआयडीसी मधील मिलापनगर येथील एका बंद बंगल्यात आज पहाटे तीन साडेतीन दरम्यान चोर घुसले. बंगल्यात घुसल्यानंतर त्यांनी इतर कुठे कॅमेरे लावले आहे, याचा शोध घेतला. बंगल्याच्या समोरील भागात एक कॅमेरा लावलेला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निदर्शनास आल्यानंतर या भामड्याने कॅमेऱ्यापासून तोंड लपवत आला आणि स्प्रे मारला. आता कॅमेऱ्या बंद झाला, असं समजून त्यांनी बंगल्याचे दार फोडण्याचा प्रयत्न केला. पण, सदर बंगल्याचा बाजूचा बंगल्यात राहणारे एक वरिष्ठ नागरिकाला पहाटे जाग आली आणि त्यांना एक वाहन बाजूच्या बंगल्याचा गेट समोर उभे करून त्यातील चारजण खाली उतरलेले दिसले. हेही वाचा - जालना हादरलं! जन्मदात्या आईचा खून करून मामाला केला फोन, दारुड्या मुलाचं कृत्य त्यानंतर जोरात आवाज आल्यावर या वरीष्ठ नागरिकाने शिट्टीचा आवाज व आरडाओरडा केल्यानंतर सदर चोरट्यांनी आलेल्या वाहनातून पलायन केले. स्प्रे मारण्यापूर्वी सदर चोरट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिलापनगर मध्ये यापूर्वीही लॉकडाउन काळात चोरीचे प्रयत्न झाले आहेत. आता पोलीस या टोळीला पकडतील का हे पहावे लागेल. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Cctv, Kalyan, KDMC, कल्याण, चोरी, डोंबिवली

पुढील बातम्या