Home /News /crime /

माथेफिरू प्राध्यापकाचा पत्नीनंतर कॉन्स्टेबल आणि शिक्षकावर हल्ला, पोलीस ठाण्यातच केले सपासप वार

माथेफिरू प्राध्यापकाचा पत्नीनंतर कॉन्स्टेबल आणि शिक्षकावर हल्ला, पोलीस ठाण्यातच केले सपासप वार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Ahmednagar crime: एका प्राध्यापकाने पोलीस आणि शिक्षकावरच हल्ला (Professor Attack on Teacher and Police) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  अहमदनगर, 24 मे : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस (Police) सर्वांची रक्षा करतात. तर शिक्षक (Teacher) हा सर्वांना विद्यादानाचे कार्य करतो. दोन्ही जण आपापल्या परीने समाजाची सेवा करत असतात. मात्र, याच शिक्षक आणि पोलीस या दोघांसोबतच एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. ही घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहाता (Rahata) तालुक्यात घडली. एका प्राध्यापकाने पोलीस आणि शिक्षकावरच हल्ला (Professor Attack on Teacher and Police) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने पत्नीसोबत झालेल्या वादातून संतापात पत्नीच्या डोक्यात फरशी टाकली. यात ती जबर जखमी झाली. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात जात एका पोलिसावर आणि तेथे उपस्थित असलेल्या एका शिक्षकावरही चाकूने सपासप वार केले. यात शिक्षक आणि पोलीस दोन्ही जखमी झाले आहेत. ही घटना काल सोमवारी 23 तारखेला घडली. सासरवाडीवर जीवे मारण्याचा आरोप केला - प्राध्यापक विजय बर्डे याने आपली पत्नी शैला (वय 35) हिच्या डोक्यात फरशी घालून तिला जबर जखमी केले. तसेच सासरवाडीतील लोकांनी मला विष पाजून जीवे मारणाच्या प्रयत्न केला, असा गलका करत स्वत: रुग्णवाहिका आणि पोलिसांना फोन केला. इतकेच नव्हे तर स्वत: श्रीरामपूर तालुका पोलिसांसमोर हजर झाला. याच दरम्यान टाकळीभाग येथील शिक्षक किशोर शिंदे पासपोर्टच्या कामासाठी आले होते. त्यांच्यावरही या माथेफिरू प्राध्यापकाने चाकूने वार केल्याने शिंदे जखमी झाले आहेत. तसेच पोलीस ठाण्यातील कॉन्टेबल संतोष रामकिसन बर्डे यांच्यावरही त्याने वार केला. इतकेच नव्हे तर आणखी एका पोलिसावर हल्ला करण्याचा प्रयत्नात असलेल्या या प्राध्यापकाला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. हेही वाचा - प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक प्रकार
  आरोपी माथेफिरू प्राध्यापक हा मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्याच्यावर कोल्हापुरातील डॉ. शहा यांच्याकडे उपचार सुरू आहेत, असे त्याच्या आईने सांगितले आहे. तर जखमी शैला बर्डे, किशोर शिंदे आणि संतोष बर्डे यांच्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येईल, असे डीवायएसपी संदीप मिटके यांनी सांगितले आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Ahmednagar News, Crime news, Police

  पुढील बातम्या