मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रसिद्ध लेखक सलमान रुश्दी यांच्यावर अमेरिकेत जीवघेणा हल्ला, भाषण देण्याआधीच चाकूने भोसकले

प्रसिद्ध लेखक सलमान रुश्दी यांच्यावर अमेरिकेत जीवघेणा हल्ला, भाषण देण्याआधीच चाकूने भोसकले

शुक्रवारी रश्दी जेव्हा व्याख्यान देणार होते, तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला.

शुक्रवारी रश्दी जेव्हा व्याख्यान देणार होते, तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला.

शुक्रवारी रश्दी जेव्हा व्याख्यान देणार होते, तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला.

  • Published by:  News18 Desk
न्यूयॉर्क, 12 ऑगस्ट : अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यूयॉर्क शहरात एका कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करण्यात आला. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रश्दी जेव्हा व्याख्यान देणार होते, तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. भारतीय वंशाचे इंग्रजी लेखक रश्दी हे 1980 च्या दशकात त्यांच्या पुस्तकाबद्दल वादात सापडले होते. या पुस्तकाबद्दल मुस्लिम समाजात प्रचंड रोष होता, एका धर्मगुरूने त्यांच्या मृत्यूचा फतवाही काढला होता. तर असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, त्यांच्या रिपोर्टरने चौटाका इन्स्टिट्यूटमधील एका व्यक्तीला वेगाने स्टेजजवळ येताना पाहिले. ओळख होत असतानाच या माणसाने रश्दी यांना धक्काबुक्की किंवा भोसकले. यामुळे लेखक रश्दी हे जमिनीवर पडले. सलमान रश्दी यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे. कारण अनेक मुस्लिम याला ईशनिंदा मानतात. याच्या अगदी एका वर्षानंतर, दिवंगत इराणचे नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी एक फतवा जारी केला होता, ज्यात रश्दीच्या मृत्यूचे आवाहन करण्यात आले होते. तसेच इतकंच नाही तर रश्दीची हत्या करणाऱ्याला 3 दशलक्ष डॉलर्सहून अधिक बक्षीस देण्याचीही या फतव्यात म्हटले होते. हेही वाचा - डॉक्टर पत्नीवरील संशयामुळे किचनमध्ये लावला सिक्रेट कॅमरा अन् अंदाज ठरला खरा तब्बल इतके बक्षीस - इराणच्या सरकारने खोमेनी यांच्या फर्मानापासून लांब ठेवले आहे, परंतु रश्दीविरोधी त्यांची भावना कायम आहे. 2012 मध्ये, अर्ध-अधिकृत इराणी धार्मिक प्रतिष्ठानने रश्दीवरील बक्षी हे 2.8 मिलिअन डॉलर वरुन 3.3 मिलिअन डॉलर वाढवले आहे. रश्दी यांनी त्यावेळी ती धमकी फेटाळून लावली आणि असे म्हटले की, अशा बक्षिसात लोकांना रस असल्याचा "कोणताही पुरावा" नाही. त्यानंतर रश्दींनी या फतव्याबद्दल एक आठवणी जोसेफ अँटोनही प्रकाशित केली.
First published:

Tags: Crime news

पुढील बातम्या