अदिलाबाद, 5 फेब्रुवारी : एटीएम मशीन (ATM Machine) फोडून चोरी होण्याच्या घटना आपण नेहमीच पाहत असतो. अदिलाबादमध्ये (Adilabad) अशीच एक घटना घडली. पोलीस स्टेशनशेजारी असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी (Burglars) अक्षरशः उचकटून काढत चोरुन नेले. विशेष म्हणजे ही घटना घडत असताना पोलिसांना (Police) साधा सुगावा देखील लागला नाही.
द हंस इंडियाच्या वृत्तानुसार, शुक्रवारी चोरट्यांनी अदिलाबाद शहरातील पोलीस स्टेशननजीक असलेले एटीएम मशीन उचकटून काढले, आणि हे मशीन घेऊन चोरट्यांनी पलायन केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस स्टेशनजवळ ही घटना घडत असताना देखील पोलिसांना याचा सुगावा कसा लागला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शुक्रवारी पहाटे 3 वाजता चोरटे शार्व्होलेट तवेरा या गाडीतून जिल्हाधिकारी चौकानजीकच्या एटीएम सेंटरमध्ये आले. त्यानंतर त्यांनी जवळील साहित्याच्या सहाय्याने एटीएम मशीन उचकटून काढले आणि त मशीन चारचाकी गाडीच्या टपावर बांधत पलायन केले. ही घटना अदिलाबाद टाऊन 2 पोलिस स्टेशननजीक घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवीचंद चौकाजवळील एका दागिन्यांच्या दुकानात चोरी करण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला, परंतु, तो अयशस्वी झाला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा एटीएम सेंटरकडे वळवला. एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करीत त्यांनी एटीएम मशीन उचकटून काढत वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. शहरानजीकच्या भागात एटीएम मशीन घेऊन जात असलेल्या चोरट्यांचे वाहन पेट्रोलिंगवर (Patroling) असलेल्या पोलिसांनी पाहिले असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
हे देखील वाचा - धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांचा चुलत भाऊ आणि वहिनीची हत्या; घरात मृत अवस्थेत आढळलं दाम्पत्य
डीएसपी वेंकटेश्वरा राव यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. कोरोना काळानंतर बेरोजगारी वाढली आहे आणि त्यामुळेच सहज पैसे मिळवण्याच्या उद्देशाने चोऱ्या, दरोडे घातले जात आहेत. शहरांत गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. बँकेच्या एटीएममशीनमध्ये पैसे असातत हे माहीत असल्याने अशा चोऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.