ग्वालिअर, 5 नोव्हेंबर : जिल्ह्यातून एक स्तब्ध करणारी घटना समोर आली आहे. पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका 11 वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात तयार केलेल्या विद्यार्थ्याने टायने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही पूर्ण घटना थाटीपूर परिसरातील दर्पण कॉलनीतील आहे. सांगितले जात आहे की, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने ऑनलाइन क्लासमध्ये हजेरी लावली होती. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून या प्रकरणाचा तपास करीत आहे.
अभ्यासात हुशार होता विद्यार्थी
विद्यार्थ्याचे वडील अकलेश सक्सेना यांनी सांगितले की, तो अभ्यासात खूप हुशात होता. मग योगा असो की इलेक्ट्रॉनिक सामानांपासून कोणतीही नवी वस्तू तयार करावयाची असो..तो कायम प्रयोग करीत होता. सार्थक दिवसाला दोन ऑनलाइन क्लास अटेंड करत होता. पहिला वर्ग दुपारी 1.30 ते 2.00 पर्यंत होता आणि दुसरा दुपारी 3.00 ते 3.30 पर्यंत चालायचा. दिवसभरात ऑनलाइन क्लास अटेंड केल्यानंतरही सार्थक ऑनलाइन व्हिडीओंनी अभ्यास करीत असे. ऑनलाइन क्लास झाल्यानंतर असं काय झालं की विद्यार्थ्याने आत्महत्येसारखं पाऊल उचललं. सार्थकने उचललेल्या या पावलामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा-पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी करीत होती प्रार्थना; तो मोजत होता शेवटच्या घटका
ऑनलाइन क्लासवर याचिका
ऑनलाइन क्लासमुळे लहान मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मध्य प्रदेशातील जबलपूर हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की, सरकारच्या ऑनलाइन आदेशाला तातडीने स्थगित करण्यात यावं. कारण हे प्रकरण लहान मुलांच्या आरोग्य आणि भविष्याशी जोडलेलं आहे.
फॉरेन्सिक टीमकडून तपास
सबइन्स्पेक्टर आरपी खरे यांनी सांगितले की, सध्या घाईघाईत ऑनलाइन क्लास हे आत्महत्येचं मुख्य कारण असल्याचं म्हणू शकत नाही. पोलीस सर्व पैलूंचा तपास करीत आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. घटनास्थळाहून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. यानंतर आता पोलीस त्याच्या आत्महत्येचं कारण शोधत आहेत.