मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Shocking! रात्री सर्वजण हसत-खेळत होते; सकाळी कुटुंबातील 5 जणांचा आढळला मृतदेह

Shocking! रात्री सर्वजण हसत-खेळत होते; सकाळी कुटुंबातील 5 जणांचा आढळला मृतदेह

एकाच घरातील तीन मुलांसह 5 जणांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळले.

एकाच घरातील तीन मुलांसह 5 जणांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळले.

एकाच घरातील तीन मुलांसह 5 जणांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळले.

पलवल, 30 सप्टेंबर : पलवलमधील दिल्ली-आग्रा नॅशनल हायवेजवळील एक गाव औरंगाबादमधील एकाच घरातील तीन मुलांसह 5 जणांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह (Dead Body at Home) आढळले. मृतांमध्ये पती-पत्नी, मुलगा, मुलगी आणि पुतणीचा समावेश आहे. मृत नरेश कुमार यांच्या वडिलांनी या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्रीची आहे. एसएसपी दीपक गहलावत यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात हे प्रकरण हत्या (Murder) आणि आत्महत्येशीसंबंधित (Suicide) असल्याचं दिसतं. मात्र अद्याप यामागील कारण समोर आलेलं नाही. व्यवसायात नुकसात होत असल्यानं हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Crime News)

सकाळी आवाज दिला मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही..

एसएसपी गहलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद निवासी लक्खीरामने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दिल्यानुसार, त्यांना सकाळी 5 वाजता जाग आली आणि ते मुलगा नरेशला आवाज दिला. आवाज दिल्यानंतरही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने ते घरात गेले. तेथे 33 वर्षीय नरेश रश्शीच्या साहाय्याने पंख्य़ाला लटकलेले होते. खाली बेडवर नरेशची 30 वर्षीय पत्नी आरती आणि 8 वर्षीय मुलगी वर्षा व 11 वर्षीय रविता मृत अवस्थेत पडलेले होते. नरेशने 10 वर्षांचा मुलगा संजय याचा मृतदेह पडला होता. शेजारच्यांना बोलावून नरेशचा मृतदेह आणण्यात आला. (At night everyone was laughing and playing The bodies of 5 members of the family were found in the morning)

घटनास्थळावरुन काहीही पुरावा सापडला नाही...

पोलिसांनी शेजारच्यांशिवाय अन्य गावकऱ्यांची चौकशी केली. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, नरेशने आपली पत्नी, मुलं, पुतणी यांचा मारण्यासाठी विष दिलं आणि त्यानंतर स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गळा दाबण्याचाही संशय आहे. अद्याप घटनास्थळावरुन कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. सर्व मृतदेह एका खोलीत सापडले.

हे ही वाचा-हृदयद्रावक: पत्नीचे हट्ट पुरवायला कमी पडला गरीब पती; विवाहितेनं उचललं भयावह पाऊल

झांसीमध्ये काही वेळापूर्वी सुरू केला होता ढाबा

नरेशने उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झांसीमध्ये काही वेळापूर्वी ढाबा सुरू केला होता. फायदा तर काही झाला नाही, मात्र कर्ज वाढलं. तीन महिन्यांपासून कर्जाचा बोजा खूप वाढला होता. नरेश दोन दिवसांपूर्वी झांशीच्या घरी आला होता. कर्ज चुकविण्यासाठी त्याने आपलं ट्रॅक्टरदेखील विकलं, याचे पैसे लवकरच मिळणार होते. त्यापूर्वीच नरेशने हे पाऊल उचललं. यानंतर गावातील प्रत्येक व्यक्तीला जबरदस्त धक्का बसला आहे. गावभरात शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा-दिर-वहिनीमधील संबंधामुळे लग्नाच्या पहिल्याच रात्री घडला धक्कादायक प्रकार

प्रत्येक आठवड्याला मुलांना भेटायला येत होता..

घटनेनंतर नरेशचे वडील लक्खीराम यांच्यावर मोठा आघात झाला आहे. हसतं-खेळतं कुटुंब रातोरात उद्ध्वस्त झालं. नरेशची 11 वर्षांची पुतणी रविता देखील त्याच्यासोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी ट्रॅक्टर खरेगी करीत त्याने शेती व्यवसाय सुरू केला होता. मात्र यातून जास्त फायदा होत नसल्यामुळे त्यांनी झांशीमध्ये फास्टफूडचं दुकान सुरू केलं. नरेश दर आठवड्याला आपल्या मुलांना भेटायला गावी येत होता. मंगळवारी रात्री सायंकाळी झांसीहून परतला होता आणि जेवल्यानंतर रात्री 10 वाजता शेजारी आणि कुटुंबीय सदस्यांसह मजा-मस्ती करीत होता. रात्री 10 वाजता तो घरी परतला. बुधवारी सकाळी लक्खीराम आनाज देत होते, मात्र तरीही त्याने प्रतिसाद न दिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला.

First published:

Tags: Crime news, Suicide, Uttar pradesh news