Home /News /crime /

दारूचा ग्लास नीट भर म्हणून त्याने आणला हातोडा, दारुड्या मित्रांनी जे केलं ते...

दारूचा ग्लास नीट भर म्हणून त्याने आणला हातोडा, दारुड्या मित्रांनी जे केलं ते...

सकाळपासून तिघांची दारू पार्टी रंगली होती. दारूच्या नशेत तिघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे घरातच तिघांनी राडा घातला होता.

    नागपूर, 12 जून : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. खून, हत्याच्या घटनांनी शहर हादरून गेले आहे. शहरातील साईनगर भागात दारूचा ग्लास भरण्याच्या वादातून दोघा मित्रांनी एकाची हातोड्याने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, साईनगर भागात 11 जून रोजी ही घटना घडली आहे.  काल्या ऊर्फ सुरेंद्र सुखदेव तभाणे (वय 32) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचे मित्र जल्या उर्फ दीपक किसनलाल सोनी आणि शेख जलील ऊर्फ बाबा पन्नी या दोन आरोपींनी त्याची हातोड्याने ठेचून हत्या केली. हेही वाचा -वधूच्या मेकअपसाठी चालल्या होत्या बहिणी, पण वाटेत घडले भीषण... मृत तरुण सुरेंद्र तभाणे हा आठवडी बाजारात हॉटेलचा व्यवसाय करत होता.  गुरुवारी 11 जून रोजी त्याचे मित्र  बाबा पन्नी, जल्या उर्फ दीपक सोनी या दोघांसोबत घरी दारू पार्टी करत होते. सकाळपासून या तिघांची दारू पार्टी रंगली होती. दारूच्या नशेत तिघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे घरातच तिघांनी राडा घातला होता. त्यामुळे सुरेंद्र याच्या पत्नीने आरडाओरडा केल्यामुळे तिघेही जण तिथून बाहेर पडले. घरापासून काही अंतर दूर गेल्यावर मोकळ्या मैदानात पुन्हा एकदा तिघे दारू पिण्यासाठी बसले. त्यानंतर दारूचा ग्लास भरण्यावरून सुरेंद्र तभाणे आणि त्याच्या मित्रामध्ये वाद झाला. रागाच्या भरता सुरेंद्र घरात पळत गेला आणि दोघांना मारण्यासाठी हातोडा घेऊन आला. परंतु, बाबा पन्नी आणि दीपक सोनी या दोघांनी त्याच्या हातातून हातोडा हिसकावून घेतला. त्यानंतर झालेल्या झटापटीतून दोघांनी सुरेंद्रवर हातोड्याने सपासप वार केले. हेही वाचा - Unlock 1 नंतर कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी, 24 तासांत 10,956 नवे रुग्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सुरेंद्रचा मृतदेह सोडून दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे सुरेंद्रचा जागीच मृत्यू झाला. सुरेंद्रच्या हत्येची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली आणि पंचनामा केला. सुरेंद्रचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.  शांतीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेत आहे. शहरात आतापर्यंत 12 हत्या दरम्यान, नागपूर शहरात खुनाच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. गेल्या काही  दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात खुनाच्या 12 घटना घडल्या आहेत. तर नागपूरात शहरात आठ व्यक्तींची हत्या झाली आहे. नागपुरात प्रामुख्याने 27 मे रोजी एमआयडीसी आणि सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत खून, 29 मे रोजी पारडी पोलीस ठाण्यांतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला. तर 1 जूनला लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत, तसंच 2 जूनला कोतवाली आणि 3 जूनला यशोधरानगमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मार्च महिन्यात संपूर्ण शहरात केवळ 5 खुनाच्या घटना घडल्या. मात्र दोन दिवसांत शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या चार हत्याकांडांनी उपराजधानी हादरली. खुनांच्या वाढत्या घटनांनी नागपूरकरांमध्ये दहशतीचे वातावरण असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Nagpur, नागपूर, हत्या

    पुढील बातम्या