मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रेमाच्या नावावर घात; लग्नाचं आमिष दाखवून 11 वर्षे तरुणीवर बलात्कार

प्रेमाच्या नावावर घात; लग्नाचं आमिष दाखवून 11 वर्षे तरुणीवर बलात्कार

तीन दिवसांपूर्वी तरुणाचं गूपित उघड झाल्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

तीन दिवसांपूर्वी तरुणाचं गूपित उघड झाल्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

तीन दिवसांपूर्वी तरुणाचं गूपित उघड झाल्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

  • Published by:  Meenal Gangurde

मध्यप्रदेश/भोपाळ, 26 जुलै : भोपाळमधून (Bhopal News) एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. येथील एका तरुणाने तब्बल 11 वर्षे लग्नाच्या नावावर तरुणीची फसवणूक केली. तब्बल 11 वर्षांनंतर 33 वर्षांच्या तरुणीने आपल्या प्रियकराविरोधात पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ( Rape of a young woman for 11 years on the pretext of marriage)

पीडितेचा आरोप आहे की, तिचा प्रियकर तब्बल 11 वर्षे तिच्यावर बलात्कार करीत होता. लग्नाच्या नावावर तो तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवत होता. तीन दिवसांपूर्वी त्या दोघांनी ओरछा येथे भेट झाल्यानंतर तरुण आधीच विवाहित असल्याची बाब समोर आली. यानंतर पीडितेने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा-गर्भवती लेकीच्या मृतदेहाचे जमिनीत गाडलेले 12 तुकडे काढून केलं अंत्यसंस्कार

काय आहे प्रकरण?

33 वर्षीय तरुणी अशोका छोला मंदिर भागात राहते. 2009 मध्ये एका कोचिंगमध्ये शिकताना तिची भेट निवाडीमध्ये राहणाऱ्या प्रवीण पटेरिया याच्याशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. काही दिवसांनी प्रवीणने 10 डिसेंबर 2009 मध्ये भोपाळमधील अशोका गार्डन येथे एक खोली भाड्याने घेतली. येथे लग्नाचं वचन देऊन त्याने तरुणीवर बलात्कार केला. त्यावेळी प्रवीण एखा खासगी कॉलेजमध्ये इंजीनिअरिंग करीत होता. शिक्षण पूर्ण झालं आणि चांगली नोकरी लागल्यावर लग्न करीन असं वचन त्याने तरुणीला दिलं होतं. मात्र 2016मध्ये प्रवीण आपल्या घरी निघून गेला. यादरम्यानही तो भोपाळमध्ये येऊन तरुणीला भेटत होता. यावेळीही तो तरुणीला हॉटेल किंवा मित्राच्या घरी नेत तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवत होता.

यानंतर मात्र तरुणी प्रवीणवर लग्नाची जबरदस्ती करू लागला. यामुळे प्रवीण 3 दिवसांपूर्वी त्याने लग्न करायचं सांगून तरुणीला ओरछाला बोलावलं. यावेळी आरोपी म्हणाला की, तो तरुणीसोबत मंदिरात लग्न करेल. यानंतर तरुणी आपल्या एका नातेवाईकाला घेऊन मंदिरात पोहोचली. मात्र येथे आल्यावर प्रवीणने लग्न करण्यास नकार दिला. यादरम्यान तरुण आधीच विवाहित असल्याची बाब तरुणीला समजली. यामुळे नाराज तरुणीने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात FIR दाखल केली.

First published:

Tags: Bhopal News, Crime news, Rape