• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळण्याकरता 4 वर्षीय चिमुरड्याचा लढा, PM मोदींकडे केली न्यायाची मागणी

वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळण्याकरता 4 वर्षीय चिमुरड्याचा लढा, PM मोदींकडे केली न्यायाची मागणी

वडिलांच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांना कडक शिक्षा करण्याच्या मागणीसाठी आसाममधल्या (Assam) चार वर्षांच्या एका लहानग्याने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे.

  • Share this:
गुवाहाटी, 16 सप्टेंबर: वडिलांच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांना कडक शिक्षा करण्याच्या मागणीसाठी आसाममधल्या (Assam) चार वर्षांच्या एका लहानग्याने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांना या प्रकरणी कारवाई करण्याचं साकडं घातलं आहे. रिझवान साहिद लस्कर असं या लहानग्याचं नाव असून, तो अवघ्या तीन महिन्यांचा असताना त्याच्या वडिलांची हत्या झाली होती. मिरर नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, रिझवान हा आसाममधल्या सिल्चर इथला रहिवासी आहे. 26 डिसेंबर 2016 रोजी आसामच्या कचर जिल्ह्यात (Cachar District) सोनई रोड (Sonai Road) परिसरात 11 जणांनी हल्ला करून रिझवानचे वडील साहिदुल आलोम लस्कर (Sahidul Alom Laskar) यांचा खून केला होता. तेव्हा रिझवान (Rizwan Laskar) अवघ्या तीन महिन्यांचा होता. साहिदुल हे काँट्रॅक्टर होते. मीडिया अहवालानुसार, त्यांना सँड माफियांच्या अनेक गुप्त गोष्टी कळल्या होत्या. त्यामुळे सँड माफियांनीच त्यांचा निर्दयपणे खून केला असल्याचं बोललं जात आहे. हे वाचा-खात्यात अचानक आले 5 लाख, मोदींच्या नावावर केली एैश; आता तुरुंगात रवानगी साहिदुल यांची पत्नी, म्हणजेच रिझवानच्या आईने सिल्चरमधल्या तारापूर पोलिस स्टेशनला (Tarapur Police Station) याआधीच 11 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे; मात्र त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासात फारशी काही प्रगती झालेली नाही, असं रिझवानच्या आईने सांगितलं. दरम्यान, साहिदुल यांची गूढरीत्या आणि निर्दयपणे हत्या (Brutally Murdered) होऊन चार वर्षं झाली, तरी दोषींच्या मुसक्या आवळण्यात कचर पोलिसांनी जाणूनबुजून कुचराई केली आहे, असा आरोप साहिदुल यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. हे वाचा-'कपडे काढ, नाक घास, झाडू मार...', महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा छळ, शिक्षकाला अटक या पार्श्वभूमीवर अखेर चार वर्षांच्या रिझवानचा व्हिडीओ तयार करून त्याद्वारे या प्रकरणाकडे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'मला न्याय हवाय' असं लिहिलेला बोर्ड रिझवानने हातात घेतल्याचं या व्हिडीओत दिसतं आहे. 'मी तीन महिन्यांचा असताना माझ्या वडिलांना 11 जणांनी ठार केलं. (केस नं. 121/2017) पंतप्रधान, गृहमंत्री आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती करतो. धन्यवाद,' असं आवाहन रिझवानने या व्हिडीओतून केलं आहे. रिझवानच्याच नावाने ट्विटर अकाउंट तयार करून 13 सप्टेंबर रोजी त्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
First published: