मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीयाविरोधात तक्रार देणाऱ्या अशोक नवलेंची आत्महत्या, पंढरपुरात खळबळ

चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीयाविरोधात तक्रार देणाऱ्या अशोक नवलेंची आत्महत्या, पंढरपुरात खळबळ

 सावकारकीचा गुन्हा दाखल होऊनही तक्रारदार अशोक नवले ह्यांच्या आत्महत्येमुळे पंढरपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

सावकारकीचा गुन्हा दाखल होऊनही तक्रारदार अशोक नवले ह्यांच्या आत्महत्येमुळे पंढरपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

सावकारकीचा गुन्हा दाखल होऊनही तक्रारदार अशोक नवले ह्यांच्या आत्महत्येमुळे पंढरपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

पंढरपूर, 20 मार्च : भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे निकटवर्तीय आणि पंढरपूर (Pandharpur) भाजपचे माजी युवा मोर्चाचे अध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव (Vidul Pandurang Adhatrao) यांच्याविरोधात सावकारीचा गुन्हा दाखल करून घरावर पोलिसांनी धाड टाकली होती. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणारे अशोक नवले (Ashok Navale) यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पंढरपुरात एकच खळबळ उडाली आहे.

5 मार्च रोजी भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदूल अधटराव यांच्या घरावर पोलीस व सहाय्यक निबंधक यांनी धाड टाकली होती. अधटराव यांच्याविरुद्ध अशोक नवले खाजगी सावकाराची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. पण, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले. अधवटराव यांच्याविरोधात सावकराकीचा तक्रार देणारे तक्रारदार अशोक नवले यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.

मुंबईजवळील शहरात महिलेवर तब्बल 4 वेळा बलात्कार, डिलिव्हरी बॉयचं संतापजनक कृत्य

'माझ्या पतीने विद्यूल अधवटराव यांच्याविरोधात सावकारीचा गुन्हा दाखल केला होता. दोन दिवसांपूर्वी दादा फुंडकर हे घरी आले होते. त्यांनी दमदाटी केली होती. मग दोन दिवस ते तणावाखालीच होते. पहाटे त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. विद्यूल अधवटराव आणि कुमार तारापूरकर यांनी माझ्या पतीला त्रास दिला. गेल्या वर्षभरापासून ते त्रास देत होते, असा आरोपी अशोक नवले यांच्या पत्नीने केला.

तसंच, विद्युल अधटराव आणि कुमार तारापुरकर यांनीच अशोक नवले यांना मारहाण केल्याचा नवले कुटुंबीयांनी आरोप केला आहे.

पोलिसांनी अशोक नवले यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

खाजगी सावकार म्हणून विदूल अधटराव यांनी पैशाचे व्यवहार केले होते. त्यांच्याविरोधात अशोक नवले यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झालव्यानंतर विद्युल अधटराव यांच्या घरावर पोलीस व सहाय्यक निबंधक यांनी धाड टाकली होती. घराच्या झडतीमध्ये एकूण 48 चेक, 9 हिशेब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके, बॅक पासबुकसह रोख रक्कम 29 हजार 340 रूपये जप्त करण्यात आले होते.

शाहरुखमुळं आज मला गाता येतं’; शिल्पा शेट्टीनं सांगितला बाजीगरमधील किस्सा

अधवटराव यांच्यापाठोपाठ त्यांच्या इतर साथीदारांचीही पोलीस शोध घेत आहे. अवैध सावकरी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.  त्यांच्या विरोधात  पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात 135/2021 महाराष्ट्र सावकारी (नियमन)अधिनियम 2014 चे कलम 39, 45 सह भा.दं.वि.कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IND vs ENG : टी-20 सीरिजमध्ये पहिल्यांदाच झाल्या या 5 गोष्टी

विशेष म्हणजे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विद्युल अधटराव हे भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे सावकारकीचा गुन्हा दाखल होऊनही तक्रारदार अशोक नवले ह्यांच्या आत्महत्येमुळे पंढरपूरमध्ये खळबळ उडाली आहे.  अशोक नवले यांच्या आत्महत्येमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

First published:

Tags: BJP, Chitra wagh, Crime, Crime news, Maharashtra, Pandharpur