मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कोरोना संसर्गानंतर आसाराम बापूची तब्येत बिघडली, ऑक्सिजन 93 च्या खाली; तरीही रुग्णालयात जाण्यास नकार

कोरोना संसर्गानंतर आसाराम बापूची तब्येत बिघडली, ऑक्सिजन 93 च्या खाली; तरीही रुग्णालयात जाण्यास नकार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम (Asaram accused of sexual exploitation) सध्या राजस्थानमधील (Rajasthan) जोधपुर सेंट्रल जेलमध्ये आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

जयपूर, 24 मे: अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम (Asaram accused of sexual exploitation) सध्या राजस्थानमधील (Rajasthan) जोधपुर सेंट्रल जेलमध्ये (Jodhpur Central Jail) शिक्षा भोगत आहेत. रविवारी पुन्हा एकदा त्याचा ऑक्सिजन लेवल कमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यानंतर तुरुंग व्यवस्थापनाकडून त्याला पुन्हा एकदा AIIMS मध्ये घेऊन जाण्याची तयारी सुरू केली. (Asaram Bapu health deteriorated after corona infection) मात्र आसारामने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यानंतर मात्र आयुर्वेद यूनिवर्सिटीतून एका डॉक्टरला बोलावण्यात आलं आणि आता तुरुंगातच त्याला ऑक्सिजन दिलं जात आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतर आसारामला AIIMS मधून डिस्चार्ज देण्यात आला होता. जोधपुर सेंट्रल जेलमध्ये रविवारी सकाळी त्याची ऑक्सिजन लेवल 92 पर्यंत घटली होती. त्यानंतर तुरुंगात त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं. जेव्हा तुरुंग प्रशासनाने त्याला रुग्णालयात हलविण्याबद्दल सांगितलं तेव्हा त्याने यास विरोध केला आणि रुग्णालयातच आयुर्वेदिक उपचार देण्याची मागणी केली. त्यानंतर जेल प्रशासनाने करवड येथील आयुर्वेदिक विद्यापीठातून डॉक्टरांना बोलावलं व आसारामची तपासणी केल्यानंतर काही औषधं दिली. (Asaram Bapu health deteriorated after corona infection)

हे ही वाचा-झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता अल्पवयीन मुलगा-मुलीचा मृतदेह; घातपाताचा संशय

केवळ आयुर्वेदिक उपचार घेणार याची मागणी करीत असल्यामुळे शेवटी आयुर्वेदिक डॉक्टरांना बोलावण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून कोरोनाचा संसर्ग झाला कारणाने काही दिवस हा त्रास होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार आसारामला पोस्ट कोविडचा त्रास होत आहे. दोन दिवसांपूर्वीच आसारामच्या जेलमधून बाहेर येण्याच्या आशांवर पाणी फिरले होते. हायकोर्टाने त्याची अंतरिम जामिन फेटाळला होता.

First published: