Home /News /crime /

पत्नीचा डोळा लागताच पती दुसऱ्या खोलीत गेला; काही सेकंदात सर्वच संपलं!

पत्नीचा डोळा लागताच पती दुसऱ्या खोलीत गेला; काही सेकंदात सर्वच संपलं!

तरीही पोलीस सर्व पैलूने तपास करीत आहेत.

    जयपूर, 16 मे : राजस्थानातील (Rajasthan News) टोंक जिल्ह्यात एका सरकारी शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या (Teacher Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. बनेठा भागात राहणाऱ्या शिक्षकाने पत्नी झोपी गेल्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन आत्महत्या केली. सध्या शिक्षकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पोलीस या प्रकरणात पुढील तपास करीत आहे. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत हेमराज रेगर कंवरपुरा गावातील प्राथमिक विद्यालयात शिक्षक होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते शारिरीक आजारामुळे खंगले होते. या आजारामुळे त्यांना डिप्रेशन आलं होतं. काल रात्री ते आपल्या खोलीत बराच वेळ पत्नीसोबत गप्पा मारत होते. जेव्हा पत्नी गाठ झोपली तेव्हा दुसऱ्या खोलीत गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. पत्नी जागी झाली, तेव्हा पती बेडवर नसल्याचं पाहून ती त्याला शोधण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेली. तेथे पतीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला. आरडाओरडा केल्यानंतर नातेवाईक धावत आले. यानंतर त्याला खाली उतरवण्यात आलं. पोलिसांच्या चौकशीतून समोर आल्यानुसार, आजारामुळे शिक्षक नैराश्यात गेला होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता आहे. तरीही पोलीस सर्व पैलूने तपास करीत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Rajasthan, Suicide

    पुढील बातम्या