औरंगाबादेत खऱ्या नोटांच्या बदल्यात दुप्पट बनावट नोटा देणारी टोळी गजाआड

औरंगाबादेत खऱ्या नोटांच्या बदल्यात दुप्पट बनावट नोटा देणारी टोळी गजाआड

बनावट नोटा तयार करून रिक्षा चालकांच्या मदतीने ते बाजारात विकणाऱ्या टोळीचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

  • Share this:

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद,1 नोव्हेंबर: बनावट नोटा तयार करून रिक्षा चालकांच्या मदतीने ते बाजारात विकणाऱ्या टोळीचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कलर प्रिंटरवर घरात हुबेहूब दिसणाऱ्या 100 रुपयांच्या नोटा छापून त्या बाजारात विकणाऱ्या टोळीला पुंडलीक नगर पोलिसांनी गजाआड केले. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका परप्रांतीयाचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून 90 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हे मोठे आंतरराज्यीय रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या बनावट नोटा प्रकरणी पुंडलीक नगर पोलिसांनी शेख सलमान ऊर्फ लक्की रशीद शेख, सय्यद सैफ सय्यद असद, सय्यद सलीम साय्यद मोहम्मद या तीन आरोपींना अटक केली आहे. यामधील आरोपी सलमान हा त्याच्या घरात एका कलर प्रिंटरवर हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा छापत होता. बनावट नोटा तो तीस टक्के कमिशनवर रिक्षाचालक सैफला द्यायचा. सैफ हा ते पैशे अर्ध्या किमतीत म्हणजेच 10 हजारांची बनावट नोटा तो पाच हजारांत द्यायचा. मागील काही महिन्यांपासून या टोळीचा गोरखधंदा शहरसह परिसरात सुरू होता.

पुंडलीक नगर पोलिसांनी सेव्हन हिलजवळील मनपाच्या उद्यानात दोघांना सापळा रचून अटक केली. तर सलमानला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. घरातून प्रिंटर, कलर, कटर, स्केल अशा साहित्यासह 10 हजार रुपयांच्या बनावट नोटा, एक दुचाकी असा 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पुंडलीक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती साह्ययक पोलीस आयुक्त

रवींद्र साळुंखे यांनी दिली आहे.

VIDEO: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी मुलाखत, काय म्हणाले शरद पवार?

First published: November 1, 2019, 4:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading