स्वयंपाक घरातच पुरला पतीचा मृतदेह, महिनाभर तिथेच करत होती जेवण

स्वयंपाक घरातच पुरला पतीचा मृतदेह, महिनाभर तिथेच करत होती जेवण

आपल्या पतीची निर्घृण हत्या करुन स्वयंपाकघरात मृतदेह पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

अनूपपूर, 22 नोव्हेंबर: आपल्या पतीची निर्घृण हत्या करुन स्वयंपाकघरात मृतदेह पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वयंपाकघरात मृतदेह पुरुन त्यावर महिला जेवण करत होती. महिलेनं हत्या केल्याचं भिंग फुटताच तिने पतीच्या कुटुंबियांवर आरोप केला. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यात घडली आहे.

32 वर्षीय प्रमिलाने आपल्या वकील असलेल्या पतीची महेशची निर्घृण हत्या केली आणि त्याचा मृतदेह कुणाला या हत्येचा संशय येऊ नये म्हणून स्वयंपाकघरात पुरला. पुरावे नष्ट करण्यासाठी पत्नीने स्वत: पोलिसात पती गायब असल्याची तक्रार दिली. पतीच्या नातेवाईकांना घरात येण्यावर महिलेनं निर्बंध घातले. महिलेचं हे पितळ मृताच्या भावाने उघडं पाडलं असून आरोपीला गुरुवारी अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

22 ऑक्टोबर रोजी आपला पती गायब आहे अशी तक्रार प्रमिलाने केली होती. त्यानंतर पोलीस शोधार्थ होते. मात्र 21 नोव्हेंबर रोजी अचानक पोलिसांसमोर एक ट्विस्ट आला आणि संपूर्ण केसचा उलगडा झाला. मृतकाच्या मोठ्या भावाने अर्जुन बैनेवाल याने पोलिसांना घराचा तपास करण्याची विनंती केली. मला आणि आई-वडिलांना प्रमिला घरात घेत नाही. वारंवार घालून पाडून बोलते आणि दारातून हाकलवून देत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. भावाच्या बोलण्यात तथ्य असल्याचं लक्षात येताच अमरकंटक पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रमिलाच्या घरी पोहोचले. त्यांनी घऱाची झडती घेण्यास सुरुवात केली तेव्हा स्वयंपाघरातून कुजलेला वास येत होता. पोलिसांनी स्वयंपाकघर खोदून काढले तेव्हा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. प्रमिलाचं हत्येचं पितळ पोलिसांसमोर उघडं पडताच तिने पतीच्या कुटुंबियांवर संशय घेण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी प्रमिलाचा डाव उधळला आणि तिला या प्रकरणात अटक केली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 22, 2019, 3:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading