धक्कादायक! पतीने पत्नीकडे मागितली French Kiss, नंतर चाकूने जीभ कापून झाला फरार

धक्कादायक! पतीने पत्नीकडे मागितली French Kiss, नंतर चाकूने जीभ कापून झाला फरार

नवरा-बायकोच्या भांडणात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीकडे फ्रेंच किसची मागणी केली असता पतीने तिची जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : सहसा पती-पत्नीमध्ये भांडणं होत असतात आणि ती लगेच मिटतातसुद्धा. पण नवरा-बायकोच्या भांडणात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीकडे फ्रेंच किसची मागणी केली असता पतीने तिची जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने असं विचारल्यानंतर पत्नीला वाटलं की त्याला दोघांमधली भांडणं संपवायची आहेत. म्हणून तिने जीभ बाहेर काढताच नंतर जे घडले त्याने सर्वांनाच धक्का बसला. चक्क पतीने पत्नीची जीभ हातात धरुन चाकूने कापली आणि मग तो फरार झाला. पोलीस आता फरार आरोपी पतीचा शोध घेत आहेत.

छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडायचा नवरा

गुजरातमधील जुहापुरा इथल्या महाराज फ्लॅटमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. यानंतर पत्नीने आरोपी पतीविरूद्ध वेजलपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी तसलिनने 2008 मध्ये पती अयूबशी लग्न केलं होतं. तसलिनचा हा तिसरा तर अयूबचे हा दुसरा विवाह होता. लग्नानंतर दोन-तीन महिने आनंदाने गेले, परंतु त्यानंतर अयूबने छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल तिच्याशी भांडण सुरू केलं.

पीडित पत्नी तसलिमने पोलिसांना सांगितलं की, अयूब नोकरीबाबत निष्काळजी होता. जेव्हा ती त्याच्याशी कामाबद्दल तेव्हा तो वाद घालायचा. तो तिला मारहाण करायचा. पण या भांडणामुळे हा विवाह तुटावा असं तसलिनला अजिबात वाटत नव्हतं. त्यामुळे ती त्याचा त्रास सहन करत होती असं तिने पोलिसांना सांगितलं.

इतर बातम्या - मुलाला होता आईच्या प्रेमसंबंधाचा संशय, 3 जणांना सुपारी देऊन सांगितलं मारून टाका!

जीभ कापल्यानंतर पत्नीला खोलीत बंद करून झाला फरार...

बुधवारी रात्री दोघेही त्यांच्या खोल्यांमध्ये झोपले होते. या दरम्यान, अयूबने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर अयूबने पत्नीकडे फ्रेंच किसची मागणी केली. त्यांच्यातील भांडणं थांबवण्यासाठी अयूब प्रयत्न करत असल्याचं तसलिनला वाटलं. तिने जीभ बाहेर काढताच अयूबने चाकूने तिची जीभ कापली. यानंतर अयूबने तिला खोलीत बंद करून पळ काढला.

इतर बातम्या - Paytm यूजर्सला मोठा झटका! बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांचं होणार नुकसान

तसलिनने तिच्या बहिणीला बोलावून सर्व काही सांगितलं आणि मदत मागितली. तसलिन तिच्या कॉलनीतील काही लोकांनाही बोलावल. यानंतर तिला खोलीतून बाहेर काढण्यात आलं. लोकांनी तसलिनला एसव्हीपी रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर तिच्या जिभेवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - रशियन तरुणीवर मुंबईतील पोलिसाकडून 12 वर्ष बलात्कार, वारंवार केला गर्भपात

First published: October 11, 2019, 12:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading