Home /News /crime /

गृहप्रवेशावेळी उखाणा नाही तर बंदुकीने गोळीबार; नव विवाहितेचं कृत्य पाहून पाहुणे हादरले!

गृहप्रवेशावेळी उखाणा नाही तर बंदुकीने गोळीबार; नव विवाहितेचं कृत्य पाहून पाहुणे हादरले!

पहिल्यांदाच अशा पद्धतीने कोणा नव्या नवरीचं स्वागत करण्यात आलं असेल.

    लखनऊ, 26 मे : लग्नानंतर सासरच्या घरी नवरीचं विविध पद्धतीने स्वागत केलं जातं. मात्र उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) आग्रामध्ये ज्या पद्धतीने नवरीचं सासरी स्वागत करण्यात आलं, ते पाहून लोक हैराण झाले. यावेळी नवरीसोबत तिचा पतीदेखील होता. सासरच्या उंबरठ्यावर नवरीच्या या कृत्याचं तिच्या पतीनेही साथ दिली. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर (Marriage) एक नवविवाहिता आपल्या सासरी पोहोचली होती. नवरी सासरच्या घराच्या उंबरठ्यावर पाय ठेवताच पतीने पत्नीसोबत आनंदात फायरिंग केली. नवरीनेही पतीच्या हातातून बंदूक घेऊन हवेत फायरिंग केली. यादरम्यान कोणी व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाऊ शकते. ही घटना उत्तर प्रदेशातील खंदोली येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोडी नावाच्या तरुणाचं तीन दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर नवरी सासरचा उंबरठा ओलांडत होती. हा क्षण कायम आठवणीत राहावा यासाठी सासरच्या मंडळींनी विचित्र गोष्टींचा अवलंब केला. पतीने बंदूक मागवली आणि नव्या नवरीच्या हातात बंदूक दिली. यानंतर नव्या नवरीनेही पतीसोबत गोळीबार केला. पत्नी फायरिंग करीत असताना पतीने तिचा हात पकडून ठेवला होता. यानंतर नवरीचा गृहप्रवेश झाला. येथील महिलांनी मात्र पारंपरिक पद्धतीने महिलेचा गृहप्रवेश करवून घेतला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Marriage

    पुढील बातम्या