Home /News /crime /

गुंडांच्या सशस्त्र हल्ल्याने नागपूर हादरलं, भर चौकात एकाची हत्या

गुंडांच्या सशस्त्र हल्ल्याने नागपूर हादरलं, भर चौकात एकाची हत्या

किशोर बेडेकर हे आपल्या कारने पेट्रोल पंपाच्या जवळून जात असताना आरोपींनी त्यांची कार अडवली आणि त्यांना बाहेर खेचलं.

नागपूर 26 सप्टेंबर: उपराजधानी नागपूर एका हल्ल्याने शनिवारी हादरून गेलं. शहरातल्या वर्दळीच्या भोळे पेट्रोल पंपावर सशस्त्र गुंडांनी एकाची निर्घृण हत्या केली. भर चौकात दिवसाढवळ्या हा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केलं आहे. नागपूर शहरातला भोळे पेट्रोल पंपहा वर्दळीचं आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. शहरातल्या मध्य वस्तित असलेल्या या पेट्रोल पंपावर कायम वर्दळ असते. याच ठिकाणी हा थरार घडला आहे. दुपारच्या सुमारास 5 हल्लेखोर पेट्रोल पंपाजवळ दबा धरून बसले होते. त्यांनी अचानक हा हल्ला केला आणि किशोर बेडेकर यांची हत्या केली. किशोर बेडेकर हे आपल्या कारने पेट्रोल पंपाच्या जवळून जात असताना आरोपींनी त्यांची कार अडवली आणि त्यांना बाहेर खेचलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर धार धार शस्त्रांनी त्यांची हत्या केली. त्यानंतर ते बाईकवरून पसार झाले. काचेचा तुकडा समजून दिला फेकून, तोच निघाला 9 कॅरेटचा हिरा! किंमत वाचून व्हाल शॉक बेडेकर हे एक रेस्टॉरंट चालवत होते. आपसी वादातून ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्ला होताच बेडेकर हे रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले. पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. घटना घडली त्या ठिकाणापासून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे घर एक किलोमीटरच्या परिसरातच आहे. त्यामुळे ही घटना घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नागपूरात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांचा धाक राहिला नाही का असा सवाल विचारण्यात येत आहे. चार दिवसांत होत्याचं नव्हतं झालं, कोरोनामुळे 3 सख्ख्या भावांचा मृत्यू मृतक हा एका रेस्टोरेटचा मालक असल्याचीही माहिती मिळत आहे नागपुरातील गुन्हेगारी वाढतच चालली आहे रोजच कोणती ना कोणती घटना गुन्हेगारी क्षेत्रातली घडत असते पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही जिथे ही घटना घडली तिथून 1किलोमीटरवरच गृहमंत्री अनिल देशमुख याच घर आहे आणि इतक्या जवळ व चुकत अशा घटना घडतात.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या