इंदुर, 11 ऑक्टोबर : 'कोरोनाची चाचणी केली की नाही', म्हणून दोन तरुणांनी एका तरुणाची चेष्टा केली. त्यानंतर झालेल्या वादात लाठ्या काठ्याने मारहाण करून तरुणाची हत्या केल्याची घटना इंदुरमध्ये घडली आहे. या प्रकरणी, पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, 7 ऑक्टोबर रोजी देपालपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंडला खिमलावदा रोडवरील पुलाखाली 30 वर्षीय शाहिदचा मृतदेह आढळून आला होता.
पोलिसांनी शाहिदचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात जखमा आणि लाठ्या-काठ्याने मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. बनेडिया गावातील कुणाल उर्फ विपुल पटेल आणि राहुल उर्फ जालम या दोघांनी शाहिदची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
'भारतात गांजा कायदेशीर झाला पाहिजे...', या बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा
काही दिवसांपूर्वी शाहिद हा बनेडिया परिसरात पायी फिरत होता. तेव्हा कुणालने शाहिदला तू कोरोनाची चाचणी केली की नाही, असं म्हणून मस्करी केली होती. त्यामुळे दोघांमध्ये बराच वाद झाला होता. कुणालने याचा राग मनात धरून होता.
6 ऑक्टोबरला शाहिद हा मुंडला खिमलावदा परिसरात होता. त्यावेळी कुणाल आणि राहुल हे दोघे दुचाकीवर तिथे पोहोचले आणि शाहिदला मारहाण सुरू केली. लाठी-काठ्याने दोघांनी शाहिदला बेदम मारहाण केली. या मारहाणीत शाहिदचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर खिमलावदा पुलाखाली त्याचा मृतदेह फेकून दोघे पसार झाले होते. अखेर पोलिसांनी कुणाल आणि राहुल या दोघांनीही अटक केली आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
शिवी दिल्याच्या रागातून मित्राने केली मित्राची हत्या
तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील आळंदीमध्येही शिवीगाळ केल्याच्या वादावरून मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेड तालुक्यातील सोळू गावात घडली. प्रफुल्ल संपत गायकवाड (27) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र दीपक दिगंबर भिमटे (23) याला अटक करण्यात आली आहे.
मध्यरात्री सोसायटीमध्ये तुफान राडा, दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, LIVE VIDEO
फिर्यादी संतोष निंबाळकर यांचा सोळू गावात खटकाळी वस्ती इथं पाण्याच्या जारचा प्लांट आहे. त्यावर मागील आठ महिन्यांपासून आरोपी दीपक काम करत आहे. तो जार प्लांटच्या शेजारी त्याचा मित्र प्रफुल्ल याच्यासोबत भाड्याच्या खोलीत राहत होता.
दीपक आणि प्रफुल्ल हे दोघे जण प्लांटमध्ये जेवण करीत बसले होते. त्यावेळी दीपकने प्रफुल्ल याला अश्लिल शिवी दिली. त्यामुळे प्रफुल्लने दीपकला चापट मारली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून प्रफुल्ल हा पळून जात असताना दीपकने प्रफुल्ल याला पाठीमागून दगड मारला. हा दगड प्रफुल्लच्या डोक्यात लागल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यावेळी दीपकने पुन्हा दगड उचलून प्रफुलच्या डोक्यात मारला. यात रक्तबंबाळ झाल्याने प्रफुल्लचा मृत्यू झाला. या प्रकरणी दीपकला अटक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.