हरियाणा, 28 नोव्हेंबर : येथील मेवात जिल्ह्यातील पिपरौली गावात जन्मदात्या आईनेच आपल्या चार मुलींची हत्या (Mother killed her 4 girls) केली आहे. चारही मुली झोपल्या असताना ही घटना घडली. धारदार शस्त्राने चौघींचाही गळा कापण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. चार निरपराध मुलींच्या रक्ताने संपूर्ण घर शोकाकूल झालं होतं. पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून आरोपी आईला अटक केली आहे. हा प्रकार खरंच त्रस्त करणारा आहे. अद्यापही मुलगे व मुलींमध्ये भेद केला जातो. महिलांनी सर्व क्षेत्र पादाक्रांत केलंय पण समाजाचे विचार केव्हा बदलणार?
मेवातमधील पिपरौली गावात हा प्रकार झाल्यानंतर अनेक प्रश्न समोर उभे राहिले आहेत. खरंच मुलगे इतके महत्त्वाचे असतात? सांगितले जात आहे की, गावात राहणारी फरमिना हिला घरातून दररोज टोमणे ऐकावे लागत होते. चार मुलींना जन्म दिलेली फरमिना यामुळे खूप वैतागली होती. परिणामी तिने आपल्या चारही मुलींची हत्या केली. यामध्ये 7 वर्षांची मुस्कान, 4 वर्षीय मिस्कीना, 3 वर्षांची अल्फीशा आणि 4 महिन्यांच्या अर्बिना या झोपलेल्या असताना धारदार शस्त्राने त्यांचा कळा कापला.
हे ही वाचा-पत्नीसाठी तरुणाने स्वत:च गुप्तांगचं कापलं; त्यानंतर केलेला प्रकार पाहून हादराल
आईनेच केली चारही मुलींची हत्या
जेव्हा सकाळी वडील खुर्शीद यांचे डोळे उघडले. तेव्हा सर्वत्र रक्त पडलेलं पाहून त्यांना धक्काच बसला. मुलींचे मृतदेब पाहून त्यांनी काही कळेना. त्यांचा आवाज ऐकून शेजारीही धावत आले. सूचना मिळताच पोलिसांनाही बोलावण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळाचं निरीक्षण केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2012 मध्ये फरमिनाचा निकाह खुर्शीदसोबत झाला होता. त्यांना चार मुली होत्या. मुलींवरुन तिला सतत टोचलं जात होत. यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती. ठाण्याचे प्रभारी संतोष कुमार यांनी सांगितलं की, आरोपी महिलेवर मानसिक परिणाम झाला आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder