• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • Free FIRE गेमचा आणखी एक साइडइफेक्ट; 13 वर्षांची तरुणी घरातून फरार

Free FIRE गेमचा आणखी एक साइडइफेक्ट; 13 वर्षांची तरुणी घरातून फरार

आतापर्यंत फ्री फायर गेमच्या साइडइफेक्टच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

 • Share this:
  रायसेन, 21 नोव्हेंबर : अनेक मुलांचा जीव घेतल्यावंतर आता ऑनलाइन गेम फ्री फायरचा (Online Game Free Fire) आणखी एक साइडइफेक्ट समोर आला आहे. या गेममुळे एक अल्पवयीन मुलगी 1300 किलोमीटर लांब अल्पवयीन मुलाच्या संपर्कात आली आणि पहिल्यांदा मैत्री मग प्रेम जुळलं. शेवटी दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा प्लान केला. मुलगी घरातून फरार झाल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. (Another side effect of the Free FIRE game 13 year old girl run away from home) रायसेनमधील बेगमगंजमधून गायब झालेल्या 13 वर्षांच्या मुलीला पोलिसांनी 24 तासात उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) पंडीत दीनदयाळ उपाध्याय नगरमधून शोधून काढलं. ही मुलगी 16 वर्षांच्या मुलाला भेटली होती, जो भोपाळमधील कमलापती रेल्वे स्टेशनवर 1300 किमी दूर पश्चिम बंगालमधून तिला घेऊन जाण्यासाठी आला होता. मुलाने लग्नाचं वचनही दिलं होतं. यामुळे मुलगी त्याच्यासोबत जाण्यासाठी निघाली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीय पोलिस ठाण्यात पोहोचले होते. पोलीस मुगलसराईपासून मुलीला सोबत घेऊन आले होते. हे ही वाचा-रेल्वे ट्रॅकवर बसून PubG गेम खेळत होते दोन मित्र; ट्रेन अपघातात दुर्देवी मृत्यू बेगमजंग पोलीस ठाण्याचे प्रभारी राजपाल सिंह जादौनने दिलेल्या माहितीनुसार, 9 व्या वर्गातील विद्यार्थिनीने चौकशीत सांगितलं की, ऑनलाइन फ्री फायर गेम खेळताना पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये राहणारा 16 वर्षीय तरुणाशी मैत्री झाली होती. गेल्या वर्षभरापासून ते मोबाइलवरुन बोलत होते. याशिवाय दोघेही अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकमेकांसोबत बोलत होते. चौकशीत मुलगी म्हणाली की, त्याने शुक्रवारी रायसेनहून भोपाळला यायला सांगितलं होतं. यानंतर आम्ही कमलापती रेल्वे स्टेशनलरुन अहमदाबाद बरौनी एक्सप्रेसमध्ये बसलो. येथून आम्ही प्रयागराज, मिर्झापूर होत नंतर पश्चिम बंगालला जाण्यासाठी मुगलसराय पोहोचले होते. येथे शनिवारी पोलिसांनी दोघांनाही पकडलं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: