मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

तारीख पर तारीख...ओरडत नाराज युवकानं कोर्टातच केली तोडफोड; जीव वाचवत कर्मचाऱ्यांनी काढला पळ

तारीख पर तारीख...ओरडत नाराज युवकानं कोर्टातच केली तोडफोड; जीव वाचवत कर्मचाऱ्यांनी काढला पळ

एका घटनेत एका वैतागलेल्या व्यक्तीनं चक्क कोर्टातच तोडफोड केल्याचं पाहायला मिळालं. हा व्यक्ती अत्यंत संथ गतीनं सुरू असलेल्या सुनावणीमुळे (Court Hearing) नाराज होता, असं समोर आलं आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 18 जुलै: न्यायालयाची (Court) पायरी चढली की ती लवकर सोडणं किंवा त्यातून लवकर बाहेर पडणं काहीसं अशक्य होऊन बसतं. त्यामुळे अनेकांना या गोष्टीचा वैताग येतो. अशाच एका घटनेत एका वैतागलेल्या व्यक्तीनं चक्क कोर्टातच तोडफोड केल्याचं पाहायला मिळालं. हे प्रकरण दिल्लीच्या (Delhi) कडकडडूमा कोर्टातील (Karkardooma Court) आहे. दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात राहणारा हा व्यक्ती अत्यंत संथ गतीनं सुरू असलेल्या सुनावणीमुळे (Court Hearing) नाराज होता, असं समोर आलं आहे.

जिवंत बाळाला केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं त्यानं सगळेच हादरले

शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास तो न्यायालयात पोहोचला आणि सर्वात आधी त्यानं कोर्ट रूममध्ये ठेवण्यात आलेल्या खुर्च्या तोडण्यास सुरुवात केली. यानंतर खुर्चीच्या मदतीनंच त्यानं संपूर्ण कॉमप्यूटर सिस्टम, लाईट्स आणि पंखे तोडले. इतकंच नाही तर घाबरून तिथे उपस्थित असलेला स्टाफही बाहेर पळाला. यादरम्यान तो तारीख पे तारीख असं म्हणत तोडफोड करत होता. यानंतर कोर्ट रूममधील स्टाफने फर्श बाजार पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. मात्र, जोपर्यंत पोलीस पोहोचले तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेत पुढील तपास सुरू केला आहे.

नात्याला काळिमा! शाळकरी मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार; बीडमधील संतापजनक घटना

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीमुळे कोर्टातील बहुतेक प्रकरणांची सुनावणी ऑनलाईन पद्धतीनं होत आहे. मात्र, रोटेशननुसार प्रत्येक कोर्टातील काही स्टाफ कोर्टात जात आपलं महत्त्वाचं काम करत आहे. याचदरम्यान शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास कोर्ट नंबर 66 मधील काही स्टाफ कोर्ट रूममध्ये काहीतरी महत्त्वाचं काम करत होता. इतक्यात राकेश तिथे पोहोचला. यानंतर त्यानं जोरजोरात ओरडत तोडफोड करण्यास सुरुवात केली. यानंतर घाबरलेल्या स्टाफनं कोर्ट रूममधून बाहेर पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या कुटुंबीयांसोबत दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरातील झुग्गी वस्तीत राहणाऱ्या राकेशच्या घरावर कोणीतरी कब्जा केला होता. मात्र, या प्रकरणी कोर्टात सुरु असलेल्या संथ सुनावणीमुळे तो नाराज होता. याच कारणामुळे त्यानं तोडफोड केली.

First published:

Tags: Court, Crime, Social media viral