Home /News /crime /

भयंकर! एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासाला वैतागून तरुणीनं गुप्तांगंच कापलं आणि...

भयंकर! एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासाला वैतागून तरुणीनं गुप्तांगंच कापलं आणि...

इतकंच करुन तरुणी थांबली नाही तर तिने पुढे जे काही केलं ते भयंकरचं आहे..

    लाहोर, 16 सप्टेंबर : ब्लॅकमेलिंग आणि त्रासाला वैतागलेल्या महिलेने एक धक्कादायक पाऊल उचललं आहे. पीडित तरुणाने या तरुणीवर मोठा आरोप  केला आहे. तरुणीने गुप्तांग कापल्यानंतर त्याला एका खोलीत बंद करुन ठेवलं. तो वेदनांनी कळवळत होता. मात्र महिलेने त्यावर दया दाखवली नाही. ही घटना पाकिस्तानाही लाहोर येथील आहे. सांगितले जात आहे की लाहोरयेथील हरबंशपुरा भागात या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांचे म्हणणं आहे की, आरोपी तरुणीला तरुण खूप त्रास देत होता व तिला ब्लॅकमेलही करीत होता. त्यामुळे तरुणी खूप वैतागली होती. आणि यातूनच तिने हे पाऊल उचललं. हे ही वाचा-दिशाच्या 'लिव्ह इन पार्टनर'चा जबाब महत्त्वाचा, नितेश राणेंच अमित शहांना पत्र या प्रकरणात पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्याने लिहिलं आहे की, तो पहिल्यांदा वेहारी जिल्ह्यात राहत होता. आणि 6 महिन्यांपूर्वी तो लाहोरला आला होता. 37 वर्षीय तरुणाने सांगितले की त्याचे आरोपी तरुणीसोबत शारीरिक संबंध होते. ही तरुणीदेखील गेल्या 18 वर्षांपासून याच भागात राहत होती. हे ही वाचा-खेड हादरलं! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आठवड्यातील दुसरी घटना पुढे पीडित तरुणाने सांगितले की, महिलेने फोन करुन त्याला एका जागेवर बोलावले. त्यानंतर धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला केला. पुढे त्याने सांगितले की तरुणीने त्याचं गुप्तांग कापलं व त्याला एका खोलीत डांबून ठेवलं. बंद खोलीत तरुण बराच वेळ ओरडत होता. त्यानंतर शेजाऱ्यांनी तरुणाला रुग्णालयात पोहोचवलं. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदविला आहे आणि सोबतच घटनास्थळाहून काही पुरावे गोळा केले आहेत. सध्या पोलीस या प्रकऱणाचा विविध पैलूने तपास करीत आहे. तपासानंतर यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, PRIVATE part

    पुढील बातम्या