• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • अंजलीने जिवापाड केलं प्रेम, लग्नाचंही दिलं वचन; मात्र आकाशने केलेली परतफेड पाहून पोलिसही हादरले!

अंजलीने जिवापाड केलं प्रेम, लग्नाचंही दिलं वचन; मात्र आकाशने केलेली परतफेड पाहून पोलिसही हादरले!

ज्याच्यासोबत लग्नाचं स्वप्न पाहिलं त्यानेच हादरवणारा प्रकार केला.

 • Share this:
  जबलपुर, 24 सप्टेंबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपुर (Jabalpur) येथे हत्येची खळबळजनक घटना (Murder) समोर आली आहे. पोलिसांनी याचा खुलासा केला आहे. रांझी भागात राहणारी अंजली 31 मे पासून अचानक आपल्या घरातून बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिला शोधण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र ती सापडली नाही. या प्रकरणात कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यातही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. अनेक महिन्यांनंतर मुलीचा शोध लागला नाही. त्यानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अंजलीचा प्रियकर आकाश याला ताब्यात घेतलं. कडक चौकशीनंतर शेवटी आकाशने अंजलीबाबत मोठा खुलासा केला. हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. (Madhya Pradesh Crime News) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली आणि आकाश यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अंजली आकाशसोबत लग्न करून त्याची नवरी होण्याचं स्वप्न पाहत होती. मात्र त्याच प्रियकराने अंजलीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. आकाशने अंजलीचा गळा कापून तिला संपवलं. त्यानंतर जमिनीत पाच फूट खड्डा खणून त्यात तिला पुरलं. आकाशने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अंजलीचा तपास केला. जमिनीवर अंजलीचा सांगाडा सापडला आहे. (Anjali fell in love, also promised for marriage But Akash killed her, police were shocked) मे महिन्यापासून होती बेपत्ता... रांझी पोलिसांनी शुक्रवारी या खळबळजनक प्रकरणाचा खुलासा केला. हे वृत्त वाचून प्रियकर-प्रेयसीच्या संबंधाबद्दल भयावह वास्तव समोर आलं. ज्या प्रियकरासह 23 वर्षीय अंजलीने लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं, त्याच प्रियकराने अंजलीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. 31 मे पासून बेपत्ता झालेल्या अंजलीविषयी काहीच माहिती न मिळाल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. मात्र अंजली कुठेच सापडली नाही. गेल्या चार महिन्यांपासून पोलीसदेखील अंजलीचा शोध घेत होते. मात्र काहीच हाती लागलं नाही. शेवटी अंजलीच्या कुटुंबीयांनी तिचा प्रियकर आकाशविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आकाशची कडक चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. हे ही वाचा-साधुने मुलीच्या समोर केली आईची हत्या; कुऱ्हाडीने मारून धडापासून डोकं केलं वेगळं मिळालेल्या माहितीनुसार, आकाशने अंजलीला कुठे तरी घेऊन जाण्याच्या बहाण्याने व्हिकल फॅक्टरी रोड येथील एका ओसाड ठिकाणी घेऊन गेला. येथे सुऱ्याने तिच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर 5 फूट खोल खड्डा खणला व येथेच तिला गाडलं. आरोपीने आपला गुन्हा कबुल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे अंजलीचा सांगाडा सापडला असून तो पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. आकाशला अंजलीसोबत लग्न करायचं नव्हतं, मात्र अंजली त्याच्यासोबत लग्नाचं स्वप्न पाहू लागली होती. शेवटी यातून झालेल्या वादात त्याने अंजलीची हत्या केली.
  Published by:Meenal Gangurde
  First published: