खळबळजनक: वॉचमनचं झाला 'सिरियल किलर', सायनाइड हे जहाल विष देऊन केली 10 लोकांची हत्या

सायनाइड हे विष घालून तो लोकांना प्रसाद देत आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तो त्यांचे पैसे आणि सोनं चौरून घेत असे.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 11:31 PM IST

खळबळजनक: वॉचमनचं झाला 'सिरियल किलर', सायनाइड हे जहाल विष देऊन केली 10 लोकांची हत्या

हैदराबाद 6 नोव्हेंबर : आंध्र प्रदेश पोलिसांनी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आणलंय. या प्रकरणाने सर्व राज्यात खळबळ उडालीय. पोलिसांनी उघड केलेलं हे प्रकरण एका सिरियल किलरचं असून त्याने गेल्या दोन वर्षात सायनाइड हे जहाल विष देऊन तब्बल 10 लोकांची हत्या केल्याचं उघडकीस आलंय. स‍म्हाद्री उर्फ शीवा असं त्याचं नाव असून व्यवसायात अपयश आल्यानंतर तो वॉचमनची नोकरी करत होता. थरकाप उडविणारी ही घटना आंध्रातल्या वेस्ट गोदावरी जिल्ह्यातली असून  हे प्रकरण उडकीस आल्यानंतर पोलिसही हादरून गेले आहेत. शीवाची पोलीस कसून चौकशी करत असून त्यामुळे अनेक हत्या प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 38 वर्षांचा शीवा याला व्यवसायात अपयश आलं होतं त्यामुळे तो लहान सहान कामं आणि नोकरी करून आपलं पोट भरत होता. नंतर मात्र पैशाच्या हव्यासापोटी त्याची नियत बिघडली आणि तो गुन्हेगारीकडे वळला. त्यासाठी त्याने खास मोडस ऑपरेंडी बनवली होती. तांदूळ खेचू शकणारं एक दैवी नाणं आपल्याकडे आहे. त्यामुळे घरात पैसा येतो असं खोटं सांगून तो लोकांना फसवत होता.

जिल्हा रुग्णालयाच्या छतावर सुरु होते 'हे' कृत्य, आक्षेपार्ह अवस्थेत सापडली महिला

शीवाकडे असं एक चुंबकत्व असलेलं नाणं होतं त्यामुळे तांदूळ आणि इतर काही गोष्टी आकर्षित होत होत्या. चुंबकासाखं असणारं हे नाणं दैवी असल्याची तो फुस लोकांना घालत होता. लोकसही जास्त पैसे मिळतील या आकर्षणापोटी ते नाणं घेण्याची इच्छा व्यक्त करत. अशा लोकांकडून शीवा टोकन म्हणून पैसे घेत होता. नंतर त्यांना प्रसाद म्हणून काही खायला देत असे. त्यात सायनाइड हे अतिशय जहाल असलेलं विष तो त्या प्रसादात मिसळत होतं. तो विषारी प्रसाद खाल्ल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्या माणसाचा मृत्यू होत असे.

नातवाची उलटी साफ केली नाही म्हणून सुनेने सासूच्या पाठीत भोसकला चाकू

हा प्रसाद द्यायला तो रात्रीची वेळ निवडत असे. तो माणूस मृत्यूमुखी पडल्यानंतर त्याच्याजवळचा सर्व पैसा आणि सोनं नाणं तो पळवून घेऊन जात असते. अशा पद्धतीने त्याने दोन वर्षात 10 माणसांची हत्या केली. हा पैसे घेऊन तो मौज मजा करत असे अशी कबूली त्याने पोलिसांकडे दिलीय. सायनाइड हे विषय अतिशय जहाल असून ते जीभेला लागताच त्यामुळे माणसाचा मृत्यू होतो.

Loading...

शेख अमीनुल्ला बाबू ही व्यक्त त्याला सायनाइड पुरवीत असल्याची माहिती उघड झाली असून त्यालाही पोलिसांनी अटक केलीय. एका हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी त्या व्यक्तीच्या आसपास एक संशयीत फिरत असल्याचं आढळून आलं त्यानंतर पोलीस शीवापर्यंत पोहोचले आणि सगळ्या खळबळजनक प्रकरणाचा उलगडा झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2019 11:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...