मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भयंकर! जादुटोण्याच्या नादात बापाने 3 वर्षांच्या चिमुरडीचा जीव घेतला; आधी हळदीचं पाणी ओतलं, नंतर कुंकवाने...

भयंकर! जादुटोण्याच्या नादात बापाने 3 वर्षांच्या चिमुरडीचा जीव घेतला; आधी हळदीचं पाणी ओतलं, नंतर कुंकवाने...

वाईट शक्ती घालवण्यासाठी बापाने जादु-टोण्याचा आधार घेतला. आधी त्याने मुलीच्या अंगावर हळदीचं पाणी ओतलं, त्यानंतर कुंकूचाही वापर केला. (फोटोत दिसणारा लाल रंग आहे कुंकवाचा आहे)

वाईट शक्ती घालवण्यासाठी बापाने जादु-टोण्याचा आधार घेतला. आधी त्याने मुलीच्या अंगावर हळदीचं पाणी ओतलं, त्यानंतर कुंकूचाही वापर केला. (फोटोत दिसणारा लाल रंग आहे कुंकवाचा आहे)

थरकाप उडवणाऱ्या या घटनेत वडिलांनी तंत्र-मंत्रापायी (Crime News) आपल्याच मुलीचा जीव घेतला.

  • Published by:  Meenal Gangurde

अमरावती, 16 जून : आजही काही लोक जादू-टोना आणि तंत्र-मंत्राच्या अधीन जाऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करतात. आंध्र प्रदेशातून (Andhra Pradesh News) अशीच एक घटना समोर आली आहे. थरकाप उडवणाऱ्या या घटनेत वडिलांनी तंत्र-मंत्रापायी  (Crime News) आपल्याच मुलीचा जीव घेतला. आंध्र प्रदेशात अर्थमुविंगचा व्यवसाय करणाऱ्या वडिलांनी अशी काही जादू केली की, ज्यात तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. घटनेबाबत माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या व्यावसायिकाला ताब्यात घेतलं आहे.

ही घटना आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्याच्या पेरारेड्डीपल्ली गावातील आहे. येथे वेणुगोपाल नावाची व्यक्ती आपल्या दोन जुळ्या मुलींसोबत राहत होता. बुधवारी तो आपल्या घरात अनुष्ठानच्या नावाखाली जादूटोना करीत होता. यादरम्यान त्याने आपल्या मुलीवर हळदीचं पाणी टाकलं आणि यानंतर तिच्या तोंडात कुंकू भरला. ज्यानंतर मुलीचा श्वास गुदमरू लागला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. चिमुकडीला या अवस्थेत पाहताच तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र दुर्देवाने तिचा मृत्यू झाला.

व्यवसायात नुकसान होत असल्याने केला जादुटोणा...

ही घटना समोर येताच वेणुगोपालने स्वत:च्या मुलीसोबत असं कृत्य केल्याचा कोणालाही विश्वास बसत नाही. स्थानिकांनी सांगितलं की, वेणुगोपाल अर्थमुव्हिंगचा व्यवसाय करतो. गेल्या काही दिवसांपासून त्याला व्यवसायात नुकसान होत होतं. वाईट शक्तींमुळे हे नुकसान होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. ज्यानंतर वेणुगोपाल तंत्र-मंत्राच्या जाळ्यात अडकला.

मुलीच्या तोंडात कोंबलं कुंकू...

वेणुगोपाल आपल्याच राहत्या घरात एक अनुष्ठान करीत होता. वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि व्यवसायात नफा मिळवण्यासाठी त्याने तंत्र-मंत्र सुरू केलं. यादरम्यान त्याने आपल्या मुलीवर हळदीचं पाणी ओतलं. यानंतर त्याने तिच्या तोंडात कुंकू कोंबलं. ज्यामुळे चिमुरडी गुदमरू लागली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारची तिला वाचवायला गेले आणि बेशुद्धावस्थेत तिला रुग्णालयात हलवण्यात आलं.

पोलिसांनी आरोपी वडिलांना घेतलं ताब्यात...

डॉक्टरांनी सांगितलं की, रुग्णालयात आणलं तेव्हाच मुलीची प्रकृती गंभीर होती. ज्यानंतर तिला चेन्नईतील दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं. येथे गुरुवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.

First published:

Tags: Andhra pradesh, Crime news, Daughter