थेटरमध्ये घातला गोंधळ, पोलिस येताच काढली नकली तलवार आणि...

थेटरमध्ये घातला गोंधळ, पोलिस येताच काढली नकली तलवार आणि...

विशाखापट्टणम इथे घडलेल्या ह्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोंधळ घालणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक.

  • Share this:

विशाखापट्टणम, 20 नोव्हेंबर: नशेच्या धुंदीत असणाऱ्या एका तरुणाने विशाखापट्टणम इथल्या सिनेमागृहात तुफान धिंगाणा घातला. तरुणाला ताब्यात घेण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा तरुणाने स्वत: कडील तलवार काढून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या घटना खुलेआम होत असल्यानं नागरिकांकडून सुरक्षेबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे हा प्रकार घडल्याचं समोर आलं. दरम्यान घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार आरोपीचं साई असं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. हा तरुण मुलांच्या थिटेरबाहेर बसला होता. त्याच्या एका हातात दारूची बाटली आणि दुसऱ्या हातात नकली तलवार होती. तिथे असलेल्या लोकांसोबत तो हुज्जत घालत होता. नशेत त्याने थेटरचा दरवाजा उघडून घुसखोरी केली. तलवार घेऊन त्याचा मुलांसमोर धिंगाणा सुरू होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांने सुरक्षारक्षकांना ढकलून देत माकडचाळे सुरू केले. त्याचा धिंगाणा पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातड़ीनं पोलिसांना फोन करुन घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या फोननंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांनाही तरुण जुमानत नव्हता. पोलिसांनी नशेत धुंद असलेल्या तरुणाला वेगवेगळ्या पद्धतीनं समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने तलवार घेऊन पोलिसांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. अथक प्रयत्नानंतर तरुणाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. सध्या तरुण पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 07:57 AM IST

ताज्या बातम्या