मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रजासत्ताक दिनाला गालबोट, पोलीस स्टेशनमध्ये वृद्धाने घेतले पेटवून!

प्रजासत्ताक दिनाला गालबोट, पोलीस स्टेशनमध्ये वृद्धाने घेतले पेटवून!

अनिल कदम यांनी तीन दिवसांपूर्वीच शहर पोलीस स्टेशनमध्ये 25 जानेवारी रोजी आत्महत्या करणार असल्याचे पत्र दिले होते.

संगमनेर, 26 जानेवारी : देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, संगमनेरमध्ये (Sangmner) या उत्साहाला गालबोट लागले आहे. पोलीस स्टेशनमध्ये (Police station)एका वृद्ध नागरिकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल शिवाजी कदम (वय 70) असं या व्यक्तीचे नाव आहे. या दुर्घटनेत अनिल कदम हे 60 टक्क्याहून जास्त भाजले गेले आहे. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

LG K42: एलजीच्या स्मार्टफोनवर विशेष सूट,एक नव्हे तर इतक्या वर्षांची मिळेल वॉरंटी

अनिल कदम यांनी तीन दिवसांपूर्वीच शहर पोलीस स्टेशनमध्ये 25 जानेवारी रोजी आत्महत्या करणार असल्याचे पत्र दिले होते. मात्र, त्याला आत्महत्यापासून परावृत्त करण्यात पोलिसांना अपयश आले होते. मागील वर्षी सुद्धा अनिल कदम यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

काही दिवसांपूर्वी अनिल कदम यांचा गणेशवाडीतील सादिक रज्जाक शेख व सुमय्या सादिक यांच्याशी जमिनीचा व्यवहार झाला होता. पण, जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. अखेर हा वाद कोर्टात पोहोचला आहे. सादिक याच्या कुटुंबीयांना घरातून बाहेर काढावे अशी मागणी अनिल कदम यांनी केली होती. पण, प्रकरण न्यायालयात असल्यामुळे पोलिसांनी यात हस्तक्षेप करण्यास असमर्थता दर्शवली होता.  अखेर, आज सकाळी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन अंगावर रॉकेल ओतून स्वत: ला पेटवून घेतले. यात कदम हे 60 टक्के भाजले आहे, त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

First published: