हरयाणा, 28 फेब्रुवारी : पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB Bank) एका शाखेवर पडलेल्या दरोड्याची पद्धत पाहून पोलीसही चाट पडले आहेत. बँकेला शनिवार आणि रविवारी सुट्टी होती. या काळात चोरट्याने बँकेची भिंत तोडून आत प्रवेश केला आणि स्ट्राँग रुमही तोडण्याचा प्रयत्न (Robbery Case) करण्यात आला. सोमवारी जेव्हा बँक उघडली, तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला आहे. ही दरोड्याची पद्धत पाहून बँक (Punjab National Bank) कर्मचारी आणि पोलीस दोघेही चक्रावून गेले आहेत. पंजाबमध्ये असलेल्या जिंद शहरात हा प्रकार घडला आहे.
भिंतीवर ठेवले लिहून..
भिंत तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. खरा, मात्र त्यांच्याकडून स्ट्राँग रुमचा दरवाजा काही तोडू शकला नाही. स्ट्राँग रुम तोडू न शकल्याने, चिडलेल्या चोराने बँकेत तोडफोड करीत दुसरे काही हाती लागते का याचा शोध घेतला. मात्र त्यात त्याला फारसे यश मिळू शकले नाही. यानंतर चिडलेल्या चोरट्याने भिंतीवर लिहून ठेवले की, 'वादा रहा, फिर कोशिश करेंगे.'
हे वाचल्यावर एकीकडे हा गमतीचा विषयही ठरतोय, तर दुसरीकडे चोराने लिहून ठेवलेल्या संदेशाने पोलीस आणि बँकेचे टेन्शन मात्र वाढवून ठेवले आहे. आता जी भिंत तोडण्यात आली होती, तिचे बांधकाम पुन्हा सुरु करण्यात आले आहे. तसेच बँकेची सुरक्षा वाढवण्यासाठीही विचार सुरु करण्यात आला आहे.
हे ही वाचा-बायकोनं घटस्फोट देताच गायब झाला तरुण; जंगलात धक्कादायक स्थितीत आढळला मृतदेहसीसीटीव्ही दिसला चोर
बँकेत हे सगळे करताना चोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सकाळी ११.४० मिनिटांच्या सुमारास तो भिंत तोडून आत शिरला, त्यानंतर त्याने बराच काळ स्ट्राँग रुमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपेक्षित यश मिळू शकले नाही. दरवाजा तुटत नाही हे पाहून तो काही काळ तिथेच बसून राहिला. त्यानंतर त्याने मी पुन्हा येईन, असा संदेश लिहिला आणि तो फरार झाला. आता या सीसीटीव्हीच्या आधारावर या चोराला शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. जर चोराने स्ट्राँगरुमचा दरवाजा तोडला असता तर बँकेचे मोठे नुकसान झाले असते. असे बँक कर्मचार्यांचे म्हणणे आहे. बँकेत कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम आणि दागिने, कागदपत्रे होती. चोराचा हा बँकचोरीचा प्रयत्न अपयशी ठरला असला तरी चोराच्या या वेगळ्या अंदाजाची चर्चा मात्र परिसरात सुरु आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.