Home /News /crime /

प्रियकरासोबत पळून गेल्याच्या 8 दिवसांत विद्यार्थिनीचा मृत्यू; कुटुंब हादरलं!

प्रियकरासोबत पळून गेल्याच्या 8 दिवसांत विद्यार्थिनीचा मृत्यू; कुटुंब हादरलं!

या हॉटेलच्या खोलीत प्रियकरासोबत काहीजणं होते.

    मध्य प्रदेश, 13 सप्टेंबर : उज्जैनमधील (Ujjain) महाकाल भागातील हॉटेल हायलाइटच्या तिसऱ्या मजल्यावरून 11 वीतील विद्यार्थिनी संशयास्पद पद्धतीने खाली पडल्याचं वृत्त समोर आलं आहे. यानंतर तिचा जागेवरच मृत्यू झाला. 15 वर्षांची विद्यार्थिनी 4 सप्टेंबर रोजी प्रियकरासोबत पळून गेली होती. ती प्रियकर मेल्विंग जॉर्जसोबत खोलीत थांबली होती. खोलीत प्रियकराचे मित्रदेखील होते. पोलिसांना या खोलीत आक्षेपार्ह साहित्य सापडलं आहे. (An 11th grader fell suspiciously from the third floor of Hotel Highlight) या प्रकरणात हॉटेल मालक, प्रियकर आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करीत असून या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. रविवारी रात्री 11.48 वाजता तरुणी रस्त्यावर पडताना दिसली. ही तरुणी बुधवारिया भागात राहत होती. तरुणीच्या वडिलांनी सांगितलं की, घराजवळ राहणारा एक तरुण मेल्विंग जॉर्ज मुलीला 4 सप्टेंबर रोजी घेऊन गेला होता. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करणार होतो मात्र, मुलाच्या आई-वडिलांनी घरी येऊन दोघांच्या लग्नाबद्दल बोलणी केली, आणि पोलीस ठाण्यात तक्रार करण्यापासून रोखलं. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साधारण पावणे बारा वाजता मुलीच्या मृत्यूचं वृत्त आम्हाला मिळालं. यानंतर पोलिसांनी हॉटेल मालक आणि दोन तरुणांना ताब्यात घेतलं. याशिवाय हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आलं आहे. हे ही वाचा-मुलाच्या नोकरीसाठी पतीची फिल्मी स्टाइलने हत्या; महिलेनं BFच्या मदतीनं घडवला थरार खेळ आणि अभ्यासात हुशात होती तरुणी अल्पवयीन 11 च्या वर्गात शिकत होती. ती जुडो कराटेमध्ये भाग घेत होती. तिने इमारतीवरुन स्वत: उडी मारली की तिची हत्या करण्यात आली याबाबत तपास सुरू आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या