मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कुटुंबातील लोक लग्न समारंभात गेले आणि घरातूनच बाळाचं अपहरण झालं, दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

कुटुंबातील लोक लग्न समारंभात गेले आणि घरातूनच बाळाचं अपहरण झालं, दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

न्यू प्रभात कॉलनी इथं काल भरदिवसा एका दीड महिन्याच्या बाळाचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते.

न्यू प्रभात कॉलनी इथं काल भरदिवसा एका दीड महिन्याच्या बाळाचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते.

न्यू प्रभात कॉलनी इथं काल भरदिवसा एका दीड महिन्याच्या बाळाचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते.

अमरावती, 30 नोव्हेंबर : अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू प्रभात कॉलनी इथं काल भरदिवसा एका दीड महिन्याच्या बाळाचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते. यात पोलिसांनी शोध घेतल्यानंतरही बाळ सापडले नव्हते. मात्र आज सकाळी सदर बाळाचा मृतदेह हा त्याच्या राहत्या घरच्याच परिसरात असणाऱ्या विहिरीत सापडला.

घरातील काही सदस्य हे लग्न समारंभानिमित्त बाहेर गेले होते. त्यानंतर अज्ञात आरोपींनी घरात घुसून बाळाचे अपहरण केले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. घरात घुसून बाळाचं अपहरण नेमकं कशासाठी केलं, याबाबत पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती.

हेही वाचा - मुंबईनगरीला ड्रग्स माफियांचा विळखा, तब्बल 100 कोटींची झाली तस्करी!

सदर कुटुंबाच्या घराच्या परिसरात डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. कुटुंबियांनी बाळाचा शोध घेतला, मात्र त्याचा अखेरच सकाळी घरातील विहीरीतच मृतदेह सापडला. या घटनेनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाळाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केला. मात्र घरातील विहिरीमध्येच बाळाचा मृतदेह सापडला असल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाळाच्या शवविच्छेदन अहवालात नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहावं लागेल.

दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून बाळाला विहिरीत नेमकं कोणी फेकलं, याबाबतचा शोध घेण्यात येत आहे.

First published:

Tags: Amravati, महाराष्ट्र amravati