अमरावती, 5 ऑगस्ट : आपली मुलं शिक्षण करुन मोठ्या पदावर नोकरीला लागावी, त्यांच्या पंखांमध्ये बळ यावं, ते खूप यश संपादित करावेत, प्रतिष्ठेने प्रचंड मोठी व्हावीत, त्यांचा जगभरात डंका व्हावा, अशी प्रत्येक आई-वडिलांची आशा-अभिलाषा असते. प्रत्येक तरुण-तरुणी आपल्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार त्यांना अभिमान वाटावा यासाठी परिश्रम घेतात. पण काहीजण त्याला अपवाद ठरतात. काही तरुण-तरुणी आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या संधीचा गैरफायदा घेतात. आई-वडिलांनी त्यांना महाविद्यालयात शिक्षणासाठी किंवा दोन पैसे कमावण्यासाठी बाहेर जाण्यास अनुमती दिलेली असते. पण पालकांच्या याच भोळेपणाचा फायदा घेवून काही तरुण-तरुणी आई-वडिलांचा विश्वासघात करतात. ते प्रेम प्रकरण किंवा इतर कोणत्या विचित्र गोष्टींमध्ये गुंतून नको तो विचित्रप्रकार करतात. या कृत्यांमुळे त्यांच्यावर पश्चात्तापाची वेळ येते. अगदी तशीच काहिशी घटना अमरावतीत समोर आली आहे.
अमरावतीत एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका फास्ट फूड सेंटरमध्ये युवक आणि युवतींचे अश्लील चाळे सुरु होते. विशेष म्हणजे नामांकित सिटी सेंटर मॉलमध्ये हा सगळा प्रकार समोर सुरु होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिटी सेंटर मॉलच्या फास्ट फुट सेंटरमध्ये अश्लील प्रकार सुरु होता. अश्लील प्रकाराबद्दल दबक्या आवाजात गेल्या काही दिवासांपासून शहरात चर्चा सुरु होती. अखेर पोलिसांच्या कानी याबाबतची चर्चा आली आणि पोलिसांनी संबंधित फास्ट फुट सेंटरमध्ये दोन पथकांसह छापा टाकला. पोलिसांनी यावेळी काही तरुण-तरुणींना रंगेहाथ अश्लील चाळे करताना पकडलं. पोलिसांनी सर्व तरुण-तरुणींना ताब्यात घेतलं आहे.
(गुजरात फॉर्म्युला की 2014 रिटर्न? मंत्रिमंडळाबाबत भाजपचं नेमकं काय ठरलं)
संबंधित प्रकार हा अमरावतीमधील गाडगे नगर परिसरातील सिटी सेंटर मॉलमध्ये घडला. या मॉलमध्ये द ब्रँड टेस्ट नावाचे फास्ट फूड सेंटर आहे. तिथेच हा सगळा गैरप्रकार सुरु होता. फास्ट फूड सेंटरच्या नावावर तरुण युवक-युवतींना ज्यादा पैसे घेऊन चाळे करण्यासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची तक्रार पोलिसांच्या कानावर आली होती. त्यानुसार आज पोलीस आयुक्तालयाचे पथक आणि गाडगे नगर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी सिटी सेंटर मॉलवर छापा टाकत कारवाई केली. यावेळी पोलिसांनी 4 मुले आणि 5 मुलींना ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम 110, 112, 117 अंतर्गत या जोडप्यांवर आणि हॉटेल चालकावर कारवाई केली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.