रात्री उशिरापर्यंत 2 मुलींसह महिलेला पोलीस ठाण्यात बसवणे पोलिसांना भोवले, द्यावा लागला 1 लाखांचा दंड

रात्री उशिरापर्यंत 2 मुलींसह महिलेला पोलीस ठाण्यात बसवणे पोलिसांना भोवले, द्यावा लागला 1 लाखांचा दंड

अमरावती पोलिसांनी कांचनमाला गावंडे व त्यांच्या 2 मुलींना पोलीस ठाण्यात बोलावून रात्री उशिरा 9 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले आणि धमकावले....

  • Share this:

अमरावती, 02 फेब्रुवारी : सूर्यास्तानंतर महिलांना पोलीस ठाण्यात (Police Station) बोलावू नये किंवा बसवून ठेवू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे (supreme court of india) आदेश असतानाही तत्कालीन अमरावती पोलीस आयुक्त (Amravati Commissioner of Police) व विद्यमान नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (amitesh kumar) यांनी रात्रीपर्यंत महिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावल्याने राज्य मानवाधिकार आयोगाने पोलीस विभागाला एक लाख रुपये दंड ठोठावला आहे.

17 मार्च व 21 मार्च 2011 साली येथील एका गुन्ह्यात कांचनमाला गावंडे यांच्या पतीना अटक केल्यानंतर अमरावती पोलिसांनी कांचनमाला गावंडे व त्यांच्या 2 मुलींना पोलीस ठाण्यात बोलावून रात्री उशिरा 9  वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले व धमकावले होते. त्यावेळी महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हते.

LPG गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी द्या फक्त एक मिस्ड कॉल, आताच सेव्ह करा हा नंबर

या प्रकरणी कांचनमाला गावंडे यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार,(विद्यमान पोलीस आयुक्त, नागपूर) व सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. राज्य मानवाधिकार आयोगाने या प्रकरणात पोलिसांनी दोषी मानून एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.. हा दंड  ठोठावून तो दंड कांचनमाला गावंडे व त्यांच्या 2 मुलींना नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य मानवाधिकार आयोगाने राज्याचे पोलीस विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना दिले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गुन्हेगारांसोबतचा फोटो व्हायरल

राज्याच्या पोलीस महासंचालक यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार कांचनमाला गावंडे यांना अमरावती पोलीस आयुक्तालयाकडून 1 लाख रुपयाचा धनादेश प्राप्त झालेला आहे. हा पोलीस विभागाला मोठा झटका मानला जात आहे.

Published by: sachin Salve
First published: February 2, 2021, 9:50 AM IST
Tags:

ताज्या बातम्या