चोरी केल्यावर वाईट वाटायचं म्हणून देवाकडे माफी मागायचा, जयंतीलाल आता पोहोचला जेलमध्ये!

चोरी करण्याआधी जयंतीलाल रेकी करायचा. शहरातील चांगले श्रीमंत व्यापारी शोधून काढायला. त्यांच्याशी जवळीक साधून काम मागायचा

चोरी करण्याआधी जयंतीलाल रेकी करायचा. शहरातील चांगले श्रीमंत व्यापारी शोधून काढायला. त्यांच्याशी जवळीक साधून काम मागायचा

  • Share this:
    अमरावती, 05 नोव्हेंबर : अमरावती पोलिसांनी (Aramvati police) एका सराईत घरफोडी आणि चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला (Thief) अटक केली आहे. या चोराने शहरात अनेक व्यापाऱ्यांच्या घरात चोरी करून लाखो रुपये लंपास केले होते. चोरी केल्यानंतर तो मंदिरात जाऊन देवाची माफी मागत होतो. पण, आता पोलिसांनी या चोराला बेड्या ठोकून गजाआड केले आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, जयंतीलाल उर्फ कमलेश खेतमाल ओसवाल असं या चोराचे नाव आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती पोलीस त्याचा शोध घेत होती. जयंतीलाल हा मूळचा सुरतचा राहणार आहे. सिटी लाईट परिसरात राहणाऱ्या राधेशाम गर्ग यांच्याकडे घरफोडी करून जयंतीलाल पसार झाला होता. बॅगेत सापडलं 5 महिन्यांचं बाळ; बापाची भावुक चिठ्ठी वाचून ह्रदय पिळवटून निघेल 20 ऑक्टोबर रोजी त्याने गर्ग यांच्या घरी चोरी केली होती. घरातून त्याने तब्बल 6 लाखांची रोकड घेऊन तो एसटी बसने प्रवास करून वापीला पोहोचला होता. त्यानंतर त्यानंतर तो नंदूरबार आणि अमरावतीला आला होता. या काळात त्याने चोरलेली रक्कम ही दोन बँक खात्यात ठेवली होती. एवढंच नाहीतर मुळव्याधावरील उपचारासाठी त्याने 1.44 लाखांची रक्कम स्वत: जवळ ठेवली होती. इलेक्ट्रॉनिक सर्विलान्सच्या मदतीने जयंतीलालला अमरावती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याने आतापर्यंत 9 ठिकाणी चोरी केली होती. कपाटात लपवून ठेवलेल्या तिजोरीच्या चावीमुळे जयंतीलाल चोरी करत होता. सहज पैसे मिळत असल्यामुळे जयंतीलालने चोरीचा मार्ग निवडला होता. चोरीच्या प्रकरणात याआधीही त्याला अटक झाली होती. विशेष म्हणजे, चोरी केल्यानंतर आपल्या हातातून पाप घडले आहे, अशी खंत त्यांच्या मनात राहत होती. त्यामुळे चोरी झाल्यानंतर तो मंदिरात जायचा आणि आपल्या हातातून घडलेल्या पापाबद्दल माफी मागायचा. अहमदाबादमधील अनेक मंदिरात तो जात होता. बापानंच केलं पोटच्या मुलीला विधवा, प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयाचा खून चोरी करण्यासाठी जयंतीलाल आधी रेकी करायचा. शहरातील चांगले श्रीमंत व्यापारी शोधून काढायला. त्यांच्याशी जवळीक साधून काम मागायचा. काम मिळाल्यानंतर योग्य संधी मिळाली की, तो चोरी करून पसारा व्हायचा. पण, त्याचा हा खेळ आता जास्त काळ चालला नाही. अखेर अमरावती पोलिसांनी मोठ्या शिताफीने या भामट्याला अटक केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published: