लग्नाच्या 25 दिवसांनंतर इंदूरमधून गायब झालेली तरुणी सापडली अमरावतीला

लग्नाच्या 25 दिवसांनंतर इंदूरमधून गायब झालेली तरुणी सापडली अमरावतीला

तरुणीच्या कुटुंबीयांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे

  • Share this:

इंदूर, 10 जानेवारी : मुसाखेडी येथून बेपत्ता झालेल्या 24 वर्षीय मुलीला आझाद नगर पोलीस ठाण्याने अमरावती येथून ताब्यात घेतलं आहे. आमीर व त्याच्या साथीदारांनी त्या भागात असताना मादक पदार्थ देऊन तिला पळवून घेऊन गेल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र या प्रकरणात महिलेने अत्याचार आणि अपहरण केल्याचा नकार दिला आहे.

खुदाईल येथील रहिवासी असणाऱ्या या मुलीचे 11 डिसेंबर रोजी मुसाखेडी भागात राहणाऱ्या युवकाशी लग्न झाले होते. 5 जानेवारीला ती आपल्या मित्राला प्राणीसंग्रहालयाला भेटायला गेली होती. ती घरी परतली परंतू अचानक कॉल आल्यानंतर ती घरात न सांगता निघून गेली. या प्रकरणात नातेवाईक आणि हिंदूंवाद्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि सांगितलं की, त्यांच्या भागात राहणारा आमीर तिला फसवून घेऊन गेला आहे. मोबाइल लोकेशनच्या आधारावर पोलीस अमरावतीला पोहोचले आणि तरुणीला ताब्यात घेतलं. सांगितलं जात आहे की, आमीर आणि त्याच्या मित्रांनी रिपोर्ट न लिहिण्याच्या अटीवर तरुणीला सोडलं. दोन्ही पक्षांनी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तरुणीला सुपूर्द केलं. टीआय मनीष डाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीने कोणावरही आरोप लावलेले नाहीत.

आयजी हरिनारायणचारी मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार महिला व बालकांच्या संरक्षणासाठी पोलीस आता 'सन्मान' मोहीम सुरू करत आहेत. पोलीस मोहिमेअंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून बचाव करणे आणि मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना जागृत केली जाईल.

हे ही वाचा-धक्कादायक! सोशल मीडियावर सुरू होती चाइल्ड पॉर्नची विक्री; दोघांना अटकसामुदायिक पोहोच : मुले आणि महिलांच्या संरक्षणासाठी पोस्टर्स आणि स्टिकर लावण्यात येतील. स्लाइड्स, जागरूकता गाणी, अ‍ॅनिमेशन क्लिप्स, पथनाटके, वादविवाद चर्चा आदी गोष्टी शाळा, महाविद्यालये आणि परिसरांत आयोजित करण्यात येणार आहेत.

महिला सुरक्षा ऑडिट - अशी सार्वजनिक ठिकाणी निवडली आहेत जी, महिलांच्या सुरक्षेसाठी संवेदनशील आहेत आणि ज्या भागात अधिक गुन्हे घडतात. तेथे पोलीस, पंचायत, प्रशासन, महानगरपालिका, महिला व बालविकास यांच्यासह सुरक्षेचे उपाय केले जातील. तसेच स्पर्धा व सायबर जागरूकता अभियानही घेण्यात येणार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: January 10, 2021, 9:29 PM IST
Tags: marriage

ताज्या बातम्या