Home /News /crime /

Shocking! बापच नाही तर आईचं काळीजही झालं दगड; पोटच्याच मुलींचा केला लैंगिक छळ

Shocking! बापच नाही तर आईचं काळीजही झालं दगड; पोटच्याच मुलींचा केला लैंगिक छळ

मुलींचा लैंगिक छळ (sexual harassment) करणाऱ्या या आईला 700 वर्षांपेक्षा अधिक वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे.

    वॉशिंग्टन, 03 नोव्हेंबर :  जगात आपल्याला सर्वात सुरक्षित कुठे वाटत असेल ते म्हणजे आईच्या कुशीत. ही सर्वात सुरक्षित अशी जागा आहे. मात्र अमेरिकेतील दोन मुलींसाठी त्यांच्या आईची कुसच असुरक्षित ठरली. ज्या आईनं त्यांना पदराखाली घेऊन झाकायला हवं, दुनियेचा वाईट नजरांपासून वाचवायला हवं, त्याच आईनं आपल्या मुलींचा लैंगिक छळ (sexual harassment) केला आहे. ही धक्कादायक घटना घडली आहे अमेरिकेत. अमेरिकेतील 41 वर्षांची लिझा मेरी लेशरने आपल्याच दोन मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे. आपला पती माइकल लेशर मिळून तिनं मुलींवर लैंगिक अत्याचार केले. यात एक तिची सावत्र मुलगी आणि दुसरी तर तिच्या पोटचा गोळा होता. तरी या मातेचं काळीज दगडाचं की काय तिनं आपल्याच मुलींवर लैंगिक अत्याचार केला. कित्येक वर्षे दोघांनीही आपल्या मुलींचा लैंगिक छळ केला. आज तकच्या रिपोर्टनुसार, ही घटना 2007 सालची आहे. मात्र काही कारणास्तव केस बंद करण्यात आली. आता पीडित मुलींच्या मागणीनुसार ही केस पुन्हा खुली करण्यात आली. या प्रकरणावर 2 नोव्हेंबरला न्यायालयात सुनावणी झाली आणि पीडितांचा छळ करणाऱ्या या आईबापाला कोर्टानं शिक्षा ठोठावली आहे. लिझाला 723 वर्षांचा तर माइकलला 438 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. अमेरिकन कायद्यानुसार  723 वर्षांचा तुरुंगवास ही सर्वात मोठी शिक्षा आहे. हे वाचा - धावत्या कारमध्ये तरुणाने कापून घेतली हाताची नस, खेडमधील थरारक घटना परदेशातच नव्हे तर भारतातही अशा घटना वारंवार घडत असतात. ऑगस्टमध्येच असं एक प्रकरण समोर आलं होतं.  पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका नराधम बापाला बेड्या ठोकल्या होता. धक्कादायक बाब म्हणजे हा वासनांध बाप गेल्या दोन वर्षांपासून मुलीवर वारंवार बलात्कार करत होता. सतत होणाऱ्या या अत्याचाराला कंटाळून पीडितेनं प्रतिकार केला त्यावेळेस आरोपीनं तिची हत्या केली. ही पीडित तरुणी 19 वर्षांची होती. उत्तर प्रदेशातील ही घटना आहे. आपण केलेला गुन्हा उघड होऊ नये यासाठी आरोपीनं मुलीच्या मृतदेहाचे दोन तुकडे केले. तिचं शीर शेतात पुरलं तर एका गोणत्यात धड टाकून ते नाल्यात फेकलं होते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crime news, Sexual harassment, United States of America

    पुढील बातम्या