अंबरनाथ, 12 नोव्हेंबर : अंबरनाथमध्ये (Ambarnath ) मनसेचे (Mns) उपशहर अध्यक्ष राकेश पाटील (Rakesh Patil murder case) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी डी मोहन आणि त्याचे इतर दोन साथीदारांना 13 दिवसांनी अंबरनाथ पोलिसांनी (Ambarnath Police)अटक केली आहे.
मागील महिन्यात 27 ऑक्टोबर रोजी अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील जैनम रेसिडेन्सी परिसरात पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. हल्ल्याच्यावेळी पाटील यांनी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केले. गंभीर जखमी अवस्थेत पाटील यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
मास्क धुवून उन्हात ठेवला तर 99.99 टक्के कोरोनाचे विषाणू नष्ट होतात?
याप्रकरणी पोलिसांनी काही तासांतच सीडीआर लोकेशनच्या मदतीने मुरबाडमधून चार आरोपींना नाकाबंदी दरम्यान अटक केली होती. पण, मुख्य आरोपी डी मोहन आणि त्याचे साथीदार हे नाकाबंदी लागण्याच्या आधी शहराच्या बाहेर निघून गेले होते. अंबरनाथमधून बाहेर पडल्यानंतर डी मोहन थेट इंदूरला गेला होता. तिथे काही दिवस लपून राहिल्यानंतर ओंकारेश्वरला गेला, तिथेही काही दिवस थांबला. पण,पोलीस आपल्या पकडतील या भीतीने तो सारखा ठिकाणं बदलत होता. ओंकारेश्वर इथून तो नंतर जळगावातील आरोपी भरत पाटील याच्या गावी आला होता. त्यानंतर खासगी वाहनाने नागपूरला गेला.
या दरम्यान, पोलिसांनी डी मोहनच्या सर्व नातेवाईकांच्या फोनवर येणारी माहिती गोळा केला होता. डी मोहन आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात होता. अखेर नागपूरहुन तो पनवेलला येणार अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून डी मोहनला बेड्या ठोकल्या.
सोमैय्यांच्या डोक्यावर परिणाम, एहसान फरामोश माणूस; शिवसेना नेत्यानं सोडला 'बाण'
बुधवारी रात्री डी मोहन, भरत पाटील आणि रमेश डोबारी याना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना रात्रभर हिललाईन पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. गुरुवारी दुपारी त्याना न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
...म्हणून राकेश पाटील यांची हत्या केली
चौकशी दरम्यान, राकेश पाटील यांची ठरवून हत्या करण्यात आली नाही. राकेश आणि आपल्यात व्यावसायिक वाद होता. त्याला भेटायला बोलावले असता झालेल्या वादातून त्याने आपल्या कानाखाली मारली होती, त्यामुळे चिडून जाऊन सहकाऱ्यांनी राकेशवर हल्ला केला होता, अशी कबुली डी मोहनने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.