खळबळजनक! बेपत्ता पत्नीला शोधता शोधता पोहचला मित्राच्या घरी, दरवाजा उघडताच सापडले 2 मृतदेह

खळबळजनक! बेपत्ता पत्नीला शोधता शोधता पोहचला मित्राच्या घरी, दरवाजा उघडताच सापडले 2 मृतदेह

अंबरनाथ येथील एका फ्लॅटमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह सापडला. त्या दोघांचे मृतदेह सडले होते.

  • Share this:

अंबरनाथ, 21 नोव्हेंबर : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. हरवलेल्या पत्नीला शोधण्यासाठी नवरा वणवण फिरत होता. याचदरम्यान त्यानं आपल्या जवळच्या मित्राला फोन लावला, मात्र त्यानं फोन उचलला नाही. दोन दिवसांनी मित्राच्या घरी गेला, तेव्हा त्याच्या घरचा दरवाजा उघडा होता. आत गेल्यानंतर त्याला पत्नी आणि मित्राचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. ही खळबळजनक घटना अंबरनाथमध्ये घडली.

आज तकनं दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी सायंकाळी अंबरनाथ येथील एका फ्लॅटमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह सापडला. त्या दोघांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत होते. 17 नोव्हेंबरपासून बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव जयंती शाह आहे. जयंतीचा पती अजित यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याचा रिपोर्ट नोंदवला होता. तर, दुसरा मृतदेह अजितसोबत काम करणाऱ्या 39 वर्षीय संदीप सक्सेना यांचा आहे. संदीप अंबरनाथ पूर्वेतील प्रसादम रेसिडेन्सीमध्ये राहत होता.

वाचा-कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेली महिला कोसळली खोल दरीत, अन्..

सक्सेनानं आपला गळा कापण्यासाठी ग्राइंडर कटरचा वाप केला होता. दरम्यान, संदीपनं आधी जयंतीची हत्या करून त्यानंतर आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की सक्सेना आणि अजित अंबरनाथमधील एका खासगी कंपनीत काम करतात. सक्सेना अजितच्या घरी नियमितपणे यायचा आणि त्यांची पत्नी जयंतीशी मैत्री झाली होती. पोलिसांना दिलेल्या निवेदनात अजित म्हणाले की, जयंती आणि सक्सेना यांच्यात संबंध होते आणि त्याचा याला विरोध होता.

वाचा-अजबच आहे! मालकाकडून चावी मागून करायचा बाईक चोरी; चौकशीदरम्यान पोलिसही झाले हैराण

17 नोव्हेंबरपासून जयंती बेपत्ता झाली होती आणि सक्सेना अजितचे फोन उचलत नव्हता. त्यानंतर अजितनं सक्सेनाच्या घरी चौकशी केली. दरवाजा ठोठावला असता तो उघडा आढळला. जयंती आणि सक्सेना यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस सध्या याबाबत अधिक चौकशी करत आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: November 21, 2020, 10:18 AM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या