रमन राघवला गजाआड करणारे पोलीस अधिकारी अ‍ॅलेक्स फियालोह यांचं निधन

रमन राघवला गजाआड करणारे पोलीस अधिकारी अ‍ॅलेक्स फियालोह यांचं निधन

1968 च्या काळात मुंबईत रमन राघवने मुंबईत मृत्यूचे तांडव घडवले होते. एकापाठोपाठ रमनने 41 लोकांची हत्या केली होती.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : 90 च्या दशकात एकापाठोपाठ एक हत्या करून मुंबईला हादरावून सोडणार सीरियल किलर रमन राघव ( serial killer Raman Raghav)जेरबंद करणारे पोलीस अधिकारी अ‍ॅलेक्स फियालोह (alex fialho) यांचं निधन झाले आहे. वयाच्या 92 वर्षी त्यांनी मुंबई अखेरचा श्वास घेतला.

1968 च्या काळात रमन राघवने मुंबईत मृत्यूचे तांडव घडवले होते. एकापाठोपाठ रमनने 41 लोकांची हत्या केली होती. यामध्ये स्त्रीया आणि लहान मुलांचा समावेश होता. अत्यंत निर्घृणपणे त्याने हत्या केल्या होत्या. या हत्याकांडामुळे उत्तर मुंबईत रमन राघवची एकच दहशत पसरली होती. त्याकाळी रस्त्यावर झोपण्यासाठी लोकं घाबरत होती.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचे शाब्दिक खेळ सुरू, विराटच्या सुट्टीवर दिली प्रतिक्रिया

अखेर 24 ऑगस्ट रोजीसह पोलीस निरीक्षक म्हणून अ‍ॅलेक्स  फियालोह डोंगरी परिसरात कार्यरत होते. त्यावेळी भरदिवस एक व्यक्ती भिजलेली छत्री घेऊन जाताना फियालोह यांना दिसली. पाऊस नसताना ओली छत्री घेऊन कोण जात आहे, असा संशय बळावला आणि त्यांनी पाठलाग करून त्या व्यक्तीला थांबवले. जेव्हा त्याची विचारपूस केली असता तो सीरियल किलर रमन राघव असल्याचे समोर आले. फियालोह यांनी रमन राघवला अटक केली.

दैनिक लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर मुंबईत हत्याकांड घडवणारा रमन राघव गजाआड झाल्यामुळे फियालोह यांचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. त्यावेळी मुंबई पोलीस दलाकडून फियालोह यांना 1000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते.

रामराज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही, राऊतांचा मोदींना टोला

या कामगिरीनंतर फियालोह यांच्या कारकिर्द भरभराटीला आली. रमन राघव सारख्या खतरनाक गुन्हेगाराला अटक केल्यामुळे राष्ट्रपती पदक देऊन फियालोह यांना सन्मानित करण्यात आले होते.  त्यानंतर पोलीस दलात त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणात यशस्वी कामगिरी बजावली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून ते निवृत्त झाले होते.

Published by: sachin Salve
First published: November 15, 2020, 10:39 AM IST
Tags:

ताज्या बातम्या