अकोला हादरलं, आई-मुलाची आत्महत्या, वडिलांनीही पोलीस स्टेशनमध्ये केले विष प्राशन

अकोला हादरलं, आई-मुलाची आत्महत्या, वडिलांनीही पोलीस स्टेशनमध्ये केले विष प्राशन

गुरुवारी रात्री 8 वाजता घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह सापडला.

  • Share this:

अकोला, 15 एप्रिल : अकोल्यातील (Akola) बाळापूर शहराजवळच्या नदीपात्रात बुधवारी एका 15 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाच्या आईचा मृतदेह आढळून आला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच मृत महिलेच्या पतीने पोलीस स्टेशन (Police Station) विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

प्रसाद प्रकाश चितरंग असे मृत युवकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. बाळापूर जवळच  वाहणाऱ्या मन नदीपात्रात युवकाचा मृतदेह आढळून आला, तर आईचा मृतदेह आज मिळाला. बाळापूर पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी मजुरांकडून चौकशी केल्यानंतर दोन जणांनी नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून बाळापूर पोलिसांनी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपतकालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधून, सदाफळे यांच्या पथकाद्वारे नदीपात्रात दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू केला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह आढळून आला नव्हता.

राज्यासाठी आनंदाची बातमी, हाफकिन संस्थेला लस तयार करण्यास केंद्राकडून परवानगी

मृत युवकाच्या मामाने बाळापूर पोलिसात दिलेल्या माहिती नुसार, त्याची बहीण मनिषा गोविंद पाटिल हिचा विवाह बाळापूर नाका, अकोला येथील रहिवासी प्रकाश चितरंग यांच्यासोबत झाला होता. त्यांना प्रसाद हा एकुलता एक मुलगा आहे. बहीण मनिषा चितरंग ही आरोग्य विभागात नोकरी करते. जावई प्रकाश चितरंग यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर मनिषाने त्याच विभागातील व्यक्तीशी लग्न केले. मात्र बुधवारी सायंकाळी मनिषाचा मुलगा प्रसादचा मृतदेह नदीपात्रात आढळला, तर मनिषाही बेपत्ता असल्याने तिनेही नदीपात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करीत पोलीस शोध घेत होते.

गुरुवारी रात्री 8 वाजता घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह सापडला. नाल्यापासून परत घटनास्थळी नदीपर्यंत अंधारातून रेस्क्यू बोटीने मृतदेह आण्यासाठी शर्थीचे प्रयत्न संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने केले आणि महिलेचा मृतदेह पात्रातून बाहेर काढला.

IPL 2021: सर्वात महागड्या ख्रिस मॉरीसचा 'पैसा वसूल' खेळ, राजस्थानचा पहिला विजय

काही दिवसांपूर्वी मनिषा चितरंग हिचा दुसरा विवाह झाला होता. बुधवारी प्रसाद प्रकाश चितरंग याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती व मनिषा चितरंग बेपत्ता असल्याने मनिषाच्या पतीने बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन विषप्राशन करुन आत्महत्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारासाठी बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहेत. दरम्यान,  महिलेच्या पतीने बाळापूर पोलीस गाठून विषप्राशन केल्याने पोलिसांनी घातपात झाल्याचा संशय आला आहे.

Published by: sachin Salve
First published: April 15, 2021, 11:32 PM IST
Tags: motherson

ताज्या बातम्या