सांगली 02 फेब्रुवारी : खटाव ( तालुका पलूस ) येथील राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांच्यावर दोघा अज्ञात व्यक्तीनी खुनी हल्ला केला आहे. हल्लेखोर मोटरसायकलवर पसार झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलीय. खटाव -भिलवडी रस्त्यावर असलेल्या आपल्या शेतातून आनंदराव पाटील हे परतत असताना साडेअकराच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला झाला. पाटील यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
त्यांची प्रकृती चिंताजनक आहे आनंदराव पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे ते बंधू आहेत. या हल्ल्याने खळबळ उडालीय.
हल्ल्यानंतर आरोपी मोटरसायकलवरून पळून गेलेत. त्याना अटक करण्यासाठी पोलिसांनी खास पथक तयार केलंय. घटनास्थळी डॉग स्कॉडलाही आणण्यात आलंय. त्याने जे काही संकेत दिलेत त्यानुसार पोलिस शोध मोहिम राबवित आहेत. हल्ल्याचं नेमकं कारण काय आहे याचा अद्याप उलगडा झालेला नाही. आनंदराव पाटील हे 15 वर्ष सरपंचही होते.
हेही वाचा...गावातला अस्सल रँचो, शेतकऱ्याच्या मुलाने बनवली Electric सायकल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.