मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एड्सबाधित काकीचा पुतण्याविरोधात भयंकर डाव; HIV बाधित करण्यासाठी नात्याला काळिमा

एड्सबाधित काकीचा पुतण्याविरोधात भयंकर डाव; HIV बाधित करण्यासाठी नात्याला काळिमा

 प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

काकू एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं कळल्यावर मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने संपूर्ण घटनेची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

  • Published by:  News18 Desk

डेहराडून, 05 एप्रिल : एका 23 वर्षीय महिलेने आपल्या भावजयीच्या अल्पवयीन मुलाला फूस लावून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. वास्तविक, हे शारीरिक संबंध म्हणजे एक कट असल्याचे मुलाच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. संबंधित महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे आणि तिला तिच्या भावजयीच्या 15 वर्षीय मुलालाही एड्सची (HIV AIDS) लागण करायची होती. त्यामुळं तिनं या मुलासोबत सेक्स केला. या महिलेच्या पतीलाही एड्सची लागण झाली होती. प्रदीर्घ उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला (Crime news) होता.

काकू एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं कळल्यावर मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने संपूर्ण घटनेची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हा सर्व प्रकार उत्तराखंडमधील उधम सिंहनगर जिल्ह्यातील रुद्रपूरमध्ये घडला आहे.

हे वाचा - Video : मुलाला लागलं गांज्याचं व्यसन; संतापलेल्या आईने दिली भयावह शिक्षा

रुद्रपूर ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणारी महिला तिच्या पिलीभीत, पुरनपूर या गावी गेली होती. तिकडे हा पीडित मुलगा आधीपासूनच गेलेला होता. महिलेने मुलाला आपल्या जाळ्यात अडकवून सेक्सची लालसा दाखवली. काही दिवसांनी हा मुलगा त्याच्या नातेवाईकांसह ट्रांजिट शिबिराला आला तेव्हा महिलेने (काकू) पुन्हा त्याच्याशी संबंध ठेवले. नंतर जेव्हा काकू एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

हे वाचा - स्टाफचा पगार वाढवण्यासाठी मालकाने शेजारच्या पत्नीसोबत केला धक्कादायक प्रकार

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने महिलेने हे संबंध ठेवले असल्याचे मुलाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मुलाची वैद्यकीय चाचणी करून घेतल्यानंतर पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Crime, Sexual assault, Sexual harassment