मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

शिर्डी हादरली ! आधी झालं भांडण नंतर मिटला वाद, मग झाली पार्टी अन् एकाची हत्या

शिर्डी हादरली ! आधी झालं भांडण नंतर मिटला वाद, मग झाली पार्टी अन् एकाची हत्या

Crime news marathi: किरकोळ वादानंतर तरुणांनी असं काही केलं की ज्यामुळे संपूर्ण शिर्डी हादरली आहे.

Crime news marathi: किरकोळ वादानंतर तरुणांनी असं काही केलं की ज्यामुळे संपूर्ण शिर्डी हादरली आहे.

Crime news marathi: किरकोळ वादानंतर तरुणांनी असं काही केलं की ज्यामुळे संपूर्ण शिर्डी हादरली आहे.

  • Published by:  Sunil Desale

शिर्डी, 9 सप्टेंबर : दोन दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये (Shirdi) अशी काही घटना घडली की ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दोन तरुणांनी मिळून एका तरुणाची हत्या (Murder) केली आहे. आदी पार्टी केली आणि त्यानंतर मग या दोघांनी पार्टीतील तिसऱ्याची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या (2 youths arrested) आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय जगताप हा तरुण शिर्डीतील भिमनगर परिसरात राहत होता. त्यानंतर तो संगमनेरमध्ये स्थलांतरित झाला. नुकताच तो आपल्या शिर्डीतील नातेवाईकांकडे आला होता. त्याच दरम्यान त्याचा अक्षय थोरात नावाच्या तरुणासोबत वाद झाला.

सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धकानं मोडली मान; कुस्तीपटूचा मैदानातच मृत्यू, घटनेचा धक्कादायक VIDEO

या भांडणावर तोडगा काढण्यासाठी अजय हा अक्षयला पुन्हा भेटला. दोघांमध्ये चर्चा झाली आणि वाद मिटला. यानंतर त्यांनी एक पार्टी करण्याच ठरवलं. त्यानुसार त्यांनी अक्षयच्या दुकानात पार्टी सुद्धा केली. यावेळी रोहित खरात हा सुद्धा त्यांच्यासोबत पार्टीत होता.

पार्टी झाल्यावर अजयने घरी जाण्याऐवजी अक्षयच्या दुकानातच थांबण्याचा निर्णय घेतला. रात्री झोपण्यापूर्वी अजय दुकानाबाहेर लघुशंकेला गेला. त्यानंतर पुन्हा दुकानात आला असता त्याच्याकडे कोयता असल्याचं अक्षय आणि रोहितच्या निदर्शनास आलं. अजय रात्री आपल्यावर हल्ला करु शकतो असा अक्षयला संशय होता त्यामुळे त्याने अजयकडील कोयता हिसकावून घेत त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अजयचा मृत्यू झाला.

First published:

Tags: Crime, Shirdi