शेजारी राहणारा माणूसच झाला राक्षस, 5 वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार

शेजारी राहणारा माणूसच झाला राक्षस, 5 वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार

याबाबतची फिर्याद दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • Share this:

साहेबराव कोकणे, अहमदनगर, 24 जानेवारी : जामखेड शहरातील कान्होपात्रानगर येथे राहणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पाच वर्षांची चिमुरडी शाळेतून आल्यानंतर दुपारी तीन वाजता शेजारी राहणारे आरोपी सचिन शालन पवार यांच्या घरी गेली. त्यावेळी आरोपीने तिच्या गुप्तांगाला हात लावून बाजूच्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मंगळवारी  (21 जानेवारी)घडली होती. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी मुलींच्या आईवर दबाव आणल्यात आला.

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाने पीडितेच्या आईला जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली. मात्र अखेर आईने 23 तारखेला जामखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये SEX रॅकेटचा पर्दाफाश, समोर आली धक्कादायक माहिती

अत्याचार झालेली पीडीत मुलगी जखमी झाली. सदर घडलेला प्रकार मिटवण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु पीडित मुलीच्या आईने धाडसाने दोन दिवसांनंतर फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी सचिन शालन पवार यास अटक केली आहे अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे करीत आहे. जामखेड शहरातील एकाच महिन्यात दोन अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत, याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे.

First published: January 24, 2020, 2:27 PM IST

ताज्या बातम्या