कुत्रा धावला आणि दरोडा फसला, बँकेचे वाचले कोट्यवधी रुपये

कुत्रा धावला आणि दरोडा फसला, बँकेचे वाचले कोट्यवधी रुपये

एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आवाजाने कुत्रा जोरजोराने ओरडून मालकाच्या घरी घुटमळत चकरा मारू लागला.

  • Share this:

साहेबराव कोकणे, अहमदनगर 12 जानेवारी : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील  सेंट्रल बॅंकेचे एटीएम गॅस कटरने तोडून रोकड लुटण्याचा चोरटे  प्रयत्न करीत असतानाच ग्रामस्थांनी हवेत गोळीबार होताच दरोडेखोरानी गॅस, कटर आदी साहित्य जागीच टाकून पलायन केले मात्र सदर प्रकार पाळीव कुत्र्यामुळे उघडीस येऊन लाखो रुपयांची रक्कम वाचली गेली तर या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बोधेगाव येथील शेवगाव-गेवराई राज्य मार्ग नजीक येथील हुंडेकरी नगर येथील भागातील सेंट्रल बँकेचे लगत असलेले एटीएम गॅस कटरने तोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी रविवारी पहाटे तीन ते चार साडे वाजता ATM  फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आवाज आल्याने  बँकेच्या दारात असलेला पाळीव कुत्रा जोर-जोराने ओरडत मालकाच्या घरी जाऊन कुत्रा जोराने ओरडत असल्याने काहीतरी गडबड असल्याची शंका आल्याने लोक धावले आणि दरोडेखोरांना काढता पाय घ्यावा लागला.

साहिद शेख  बाबा सय्यद हे दोघे मामा भाचे  बँकेच्या दिशेने जात असताना कुत्रा पुढे पुढे धावत ओरडत होता हा प्रकार बँकेच्या लगत राहत असलेले  सामाजिक कार्यकते प्रभाकर हुंडेकरी यांना दिसला. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतःच्या रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार करताच दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले त्यांनी दरोड्यात टाकण्यासाठी आणलेले दोन गॅस टाक्या आणि साहित्य जागीच टाकून दिले.

'... तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील'

पाळीव कुत्रा बँकेतील रोजनदारीवरील कर्मचारी अकबर सय्यद यांचा असून लगतच त्याचे घर आहे तसेच त्यांचा भाचा साहीद शेख हा एटीएमची देखभाल करीत असतो. या दोघांसोबत दररोज हा कुत्रा बँकेच्या परिसरात राहतो  त्याचा नित्याचा हा प्रकार आहे. एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आवाजाने कुत्रा जोरजोराने ओरडून मालकाच्या घरी घुटमळत चकरा मारू लागला.

कामे सुरु होण्याआधीच नेते टक्केवारी मागतात, गडकरींच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ

त्याच्या आवाजाने त्याचा मामा बाबा सय्यद हे जागे झाले कुत्रा बँकेच्या दिशेने जोर-जोराने ओरडून घुटमळूत होता या संशयामुळे दोघे बँकेकडे गेल्याने हा प्रकार उघडीस आला मुक्या प्राण्यामुळे बँकेची होणारी लूट उघडीस आल्याने याची जनतेत जोरदार चर्चा होती रविवारी हा कुत्रा बँकेच्या परिसरात रुबाबात फिरत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2020 09:23 PM IST

ताज्या बातम्या